शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
3
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
4
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
5
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
6
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
7
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
8
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
9
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
10
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
11
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
12
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
13
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
14
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
15
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
16
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
17
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
18
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
19
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
20
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

अन् डोळ्यांत अश्रू तरळले! 'त्या' शाळेच्या वाटेवरील नदीवर २२ दिवसांत उभारणार साकव; एम्स फाउंडेशन आली धावून

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 6:47 PM

विद्यार्थ्यांना पावसाळ्यात वाहती नदी ओलांडून जंगलातून तीन किलोमीटर लांब पायी खडतर प्रवास करून शाळेत जावे लागते.

- विशाल हळदेलोकमत न्यूज नेटवर्क,ठाणे : शहापूर तालुक्यातील गुंडे ग्रामपंचायतीमधील विद्यार्थ्यांना भितारवाडीच्या शाळेत जाण्याकरिता भरपावसात दुथडी भरून वाहणारी नदी ओलांडावी लागते, या 'लोकमत'च्या धक्कादायक बातमीची दखल ठाण्यातीलच एम्स फाउंडेशनचे फिटनेस कोच अजित कुलकर्णी यांनी घेतली. या गावातील विद्यार्थ्यांकरिता तसेच नागरिकांकरिता नदीवर एक साकव २२ दिवसांत बांधून देण्याचे आश्वासन एम्स फाउंडेशनने दिले.

विद्यार्थ्यांना पावसाळ्यात वाहती नदी ओलांडून जंगलातून तीन किलोमीटर लांब पायी खडतर प्रवास करून शाळेत जावे लागते. भितारवाडी, चाफेवाडी आणि कोठेवाडी या तीन वाड्यांसाठी चाफेवाडी येथे जिल्हा परिषदेची पाचवी पर्यंतची शाळा आहे. २७ जणांची पटसंख्या असलेल्या या शाळेत भितारवाडी आणि कोठेवाडी येथील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना नदी ओलांडून यावे लागते. पाऊस जास्त झाल्यावर डोंगर भागातून येणाऱ्या पाण्यामुळे नदीची पातळी वाढते आणि मुले शिक्षणापासून वंचित राहतात. गावातील मोठी मुले या लहान मुलांना धरून नदीच्या पात्रातून धरून शाळेच्या बाजूला सोडतात, शाळा सुटल्यावर परत आणतात. यामुळे मुलांच्या जीवाला धोका होता. येथील लोकांना साकव बांधून देण्याची मागणी श्रमजीवी संघटनेचे सचिव प्रकाश खोडका यांनी केली होती.

 

मी गेल्या २० वर्षांपासून या गावात राहात आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुलांच्या शिक्षणाची परवड होते. इतक्या वर्षात आमच्या गावातील समस्येकडे कुणीही लक्ष दिले नाही. आम्ही 'लोकमत'चे आणि एम्स फाउंडेशनचे मनापासून आभार मानतो.- विनायक हिंदुराव, स्थानिक

....आणि डोळ्यात पाणी आले 'लोकमत'ने प्रसिद्ध केलेली बातमी वाचली आणि माझ्या डोळ्यात पाणी आले. लागलीच आम्ही ठरवले की, चाफ्याच्या वाडीत एक साकव बांधून द्यायचा. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना मुंबई शेजारील ठाणे जिल्ह्यात अशी अवस्था असेल तर कठीण आहे. मी आणि माझे सहकारी यांनी नदीवर जाऊन पाहणी केली. आम्ही या ठिकाणी ८० फूट लांबीचा, नदीच्या पात्रापासून १० फूट उंच आणि तीन फूट रुदीचा ब्रिज २२ दिवसात उभारणार आहोत. येत्या तीन दिवसात हे सर्व काम सुरु होईल. यापुढे एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही.

- अजित कुलकर्णी, संस्थापक, एम्स फाउंडेशन 

टॅग्स :Schoolशाळाthaneठाणे