शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

लोकमत, मराठी ग्रंथसंग्रहालयाचे संयुक्त वाचक अभियान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 12:49 AM

सवलतीच्या दरात संग्रहालयासह लोकमत वृत्तपत्राचेही मिळणार सदस्यत्व

ठाणे : वाचनसंस्कृती जतन, संवर्धनाचे काम करणारी आणि १२५ वर्षांची वाचनपरंपरा लाभलेले ठाण्यातील मराठी ग्रंथसंग्रहालय म्हणजे ठाणेकरांचा अभिमान. वाचनसंस्कृती अधिकाधिक वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे लोकमत वृत्तपत्राच्या साहाय्याने आणि ठाणे महाविद्यालयाच्या सहकार्याने सदस्यता नोंदणी अभियान राबवले जाणार आहे. लोकमत आणि मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संयुक्त वाचक अभियानाचा लाभ घेऊन सदस्य होता येणार आहे. या योजनेत सदस्य होणाऱ्यांना सवलतीच्या दरात संग्रहालय आणि दैनिक लोकमत या दोन्हींची सदस्यता मिळणार आहे. तसेच योजनेत सहभागी होणाऱ्यांना लोकमत वृत्तपत्राकडून एक भेटवस्तूही दिली जाणार आहे.

मराठी ग्रंथसंग्रहालय- ठाणे ही १२५ वर्षे काम करणारी संस्था आहे. सारस्वतकार वि.ल. भावे यांनी स्थापित केलेल्या या आद्य मराठी ग्रंथसंग्रहालयाचे जीवनकार्य हे मराठी साहित्य संकलन आणि त्याचे वाचक व अभ्यासकांना उपलब्ध करून देणे हे होते.मराठी भाषेत प्रकाशित झालेले प्रत्येक पुस्तक या ग्रंथसंग्रहालयात वाचकांना उपलब्ध होते. परंतु, स्वातंत्र्योत्तर काळात पुस्तकांची संख्या वाढली आणि त्यानंतर पुस्तकांची निवड करून खरेदी करण्यात आली.

वाचनसंस्कृती आणि विशेषत: मराठीचे वाचन करणारी नवी पिढी संगणक, महाजाल व नव्या वाचनसाधनांच्या आकर्षणातून गं्रथसंग्रहालयासारख्या संस्थांपासून दूर जात आहे, हे जाणवल्याने मराठी गं्रथसंग्रहालयाच्या कार्यकर्त्यांनी नव्या वाचकवर्गाला आकृष्ट करून वाचनसंस्कृती संवर्धन करण्याचा प्रयत्न केला आहे.

आज मराठी गं्रथसंग्रहालय नेताजी सुभाष पथावरील मुख्य शाखा, गोखले रोडवरील नौपाडा शाखा या ठिकाणच्या आपल्या भव्य वास्तूतून वाचकसेवा करीत आहे. विद्याधर वालावलकर हे संस्थेचे अध्यक्ष, अरुण करमरकर हे कार्याध्यक्ष, तर वासंती वर्तक या कार्यकारी विश्वस्त आहेत. चांगदेव काळे, संजय चुंबळे, महादेव गायकवाड, संजीव फडके हे कार्यवाह आहेत.

ठाणे महानगरातून परिसरातील उपनगरांत राहायला गेलेल्या वाचकांसाठी गं्रथयान या अभिनव फिरत्या ग्रंथालयाची संकल्पना संग्रहालयाने रुजविली आहे. त्याला हजारो वाचकांचा विशेषत: बालवाचकांचा उत्तम प्रतिसाद आहे. करिअर व माहितीसाठी अभ्यास करणाºया शेकडो विद्यार्थ्यांना सामावून घेणारी ग्रंथालयाची सुसज्ज अभ्यासिका हे विद्यार्थ्यांचे आकर्षण आहे.नौपाड्यात सुरू केले इंग्रजी ग्रंथालयघरपोच पुस्तके देण्याची सेवा मराठी ग्रंथसंग्रहालयाने ‘फोन अ बुक’ या नावाने सुरू केली आहे. इंग्रजीचा वाढता वाचकवर्ग लक्षात घेऊन ठाण्यामधील एक इंग्रजी गं्रथालय घेऊन मराठी ग्रंथसंग्रहालयाने इंग्रजी विभाग नौपाडा शाखेत सुरू केला आहे. ९०० पुस्तकांचे डिजिटलायझेशन व संपूर्ण गं्रथालय संगणकीकृत करण्यातही संग्रहालयाने यश मिळविले आहे. या सर्व सोयीसुविधांसह अद्ययावत असलेल्या अशा संग्रहालयाचे जास्तीतजास्त वाचकांनी सदस्य व्हावे, असे आवाहन अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी केले आहे. या योजनेत सहभागी होऊन नोंदणी करणाºयांना लोकमत आणि मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने आयोजिल्या जाणाºया सांस्कृतिक कार्यक्रमात प्राधान्य दिले जाणार आहे.

टॅग्स :Lokmatलोकमत