मुंबई - राज्याच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्राची धोरणे ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुप्रसिद्ध बाल शल्यचिकित्सक डॉ. संजय ओक यांची शनिवारी ठाण्यात ‘लोकमत टॉक’ या विशेष कार्यक्रमांतर्गत प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे. या मुलाखतीत ते रोजच्या धकाधकीच्या काळात आरोग्यदायी जीवन राखण्यासाठी काय करावे, याचा आरोग्य मंत्र देणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.डॉ. संजय ओक यांनी नायर रुग्णालयातील बाल शल्यचिकित्सक ते मुंबई महापालिका, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये यांचे संचालक म्हणून काम पहिले आहे.
तसेच त्यांनी प्रदीर्घ काळ केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून काम केले असून, रुग्ण उपयोगी विविध उपक्रम राबविले आहेत. त्याशिवाय ते सध्या राज्य कोरोना कृती दलाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. मुंबई महापालिकेतून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी आरोग्य सेवा कायम ठेवली आहे. राज्यातील ग्रामीण भागात जाऊन लहान मुलांवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया मोफत करून डॉ. संजय ओक रुग्णसेवेत कार्यरत आहेत.
‘लोकमत टॉक’ या उपक्रमांतर्गत मान्यवर व्यक्ती आणि त्यांनी केलेल्या कार्याचा पट मुलाखतीच्या माध्यमातून उलगडला जातो. आजपर्यंत अनेक मान्यवरांच्या मुलाखती या माध्यमातून घेण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमास मीडिया पार्टनर म्हणून ‘न्यूज १८ लोकमत’ सहभागी होणार आहेत.
कार्यक्रम कधी ?शनिवार : २५ फेब्रुवारीकिती वाजता ?सायंकाळी ४.४५ वाजताकुठे ? : थोरले बाजीराव पेशवे सभागृह, विद्या प्रसारक मंडळ, जोशी बेडेकर कॉलेज, चेंदणी बंदर रोड, ठाणे (प.)