शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

आठ ईव्हीएम ठाण्यात भंगार सामानात सापडल्याने खळबळ; आव्हाडांनी उपस्थित केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 6:44 AM

दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या बंद खोलीत ३५० ट्रंकांमध्ये निवडणूक साहित्य

ठाणे : ईव्हीएम की बॅलेट पेपर यावरून देशभर दावे-प्रतिदावे सुरू असताना व याबाबतच्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने  फेटाळल्या आहेत. त्याचवेळी ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये चक्क भंगार सामानात आठ ईव्हीएम  सापडल्या.

स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरी (स्टँड) खाली काही रिकाम्या खोल्या आहेत. त्यातील एका खोलीचा दरवाजा तुटल्याने तो दुरुस्त करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाचे कर्मचारी व राजकीय पक्षांचे पदाधिकारी तेथे गेले असता एका ट्रंकमधून ही आठ ईव्हीएम हस्तगत करण्यात आली. मात्र, खोलीत तब्बल ३५० ट्रंक असून मनुष्यबळाअभावी त्याची तपासणी झालेली नाही. कदाचित या अन्य ट्रंकांमध्ये ईव्हीएम असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे यावेळी उपस्थित राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.

स्टेडियममधील जिन्याखालील खोलीत ईव्हीएम आढळली आहेत. ठाणे जिल्ह्यात १०० ईव्हीएम आले, तर १०० ईव्हीएम मॅच करून जिल्हाधिकारी किंवा निवडणूक अधिकाऱ्यांच्या हातात द्यावे लागतात. असे असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात ईव्हीएम राहिले कसे, ही कुठली ईव्हीएम आहेत. २०१४ पासून ठेवलेल्या या ईव्हीएमकडे कोणाचे लक्ष कसे गेले नाही? यामुळे ईव्हीएम बदलले जातात या शंकेला पुष्टी मिळते.- जितेंद्र आव्हाड, आमदार, शरद पवार गट

ठाणे महापालिकेच्या कोंडदेव स्टेडियममधील खोलीची राजकीय पक्षांना पूर्वसूचना देऊन राजकीय प्रतिनिधींच्या समक्ष खोलीची तपासणी केली. जुन्या ग्रामपंचायत, जि. प. निवडणुकीचे साहित्य, लिफाफे तसेच एका ट्रंकमध्ये ईव्हीएम आढळली. याबाबत सविस्तर अहवाल मुख्य निवडणूक अधिकारी यांना सादर केला आहे. दरवाजाची दुरुस्ती करून दरवाजा सीलबंद केला. पोलिस बंदोबस्त पूर्ववत केला. वापरात नसलेल्या गोदामाचा व लोकसभा निवडणूक प्रक्रियेचा काहीही संबंध नाही. या प्रक्रियेचे चित्रीकरण केले आहे.   - अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी, ठाणे

टॅग्स :thane-pcठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४EVM Machineएव्हीएम मशीन