ठाणे - लोकशाहीर विठठ्ल उमप सातवा स्मृती संगीत समारोह रविवार 26 नोव्हेंबरला गडकरी रंगायतन येथे होणार आहे. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास हा कार्यक्रम होणार आहे. गायक नंदेश उमप यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली. या समारोहात शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, पाश्चात्य संगीत यांचा मेळ साधला जाणार आहे. पं. शौनक अभिषेकी यांचे शास्त्रीय संगीत, शकुंतलाबाई नगरकर यांची संगीतबारी, इफोनी ऑफिशियल यांचे फ्युजन बँड सादर होणार आहे. या फ्युजन बँडवर विठ्ल उमप यांची गाणी वाजविली जाणार आहेत. यावेळी विठ्ल उमप मृदगन्ध पुरस्कार 2017 चे वितरणदेखील होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे , कत्थक नृत्यांगना डॉ. मंजिरी देव, ढोलकी सम्राट राजाराम जामसंडेकर, पत्रकार-लेखक जयंत पवार, अभिनेते-दिग्दर्शक सुबोध भावे यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. कार्यक्रमाला पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, आदेश बांदेकर यांची प्रमुख उपस्थिती आहे, असेदेखील नंदेश यांनी सांगितले.
लोकशाहीर विठठ्ल उमप सातवा स्मृती संगीत समारोह होणार 26 नोव्हेंबरला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 1:43 PM