ठाणे : धनगर समाजाला आदिवासींच्या सर्व सवलती लागू करून राज्य शासनाने विश्वासघात केल्याचा आरोप करून त्या त्वरित रद्द करण्याच्या मागण्यांसाठी राज्यभरातील सुमारे २५ हजार आदिवासी कार्यकर्ते नाशिक येथून मुंबईला पायी लाँग मार्च काढणार आहेत. ६ मार्चपासून हा लाँग मार्च सुरू होईल. तो ९ मार्चपर्यंत मुंबईला पोहोचणार असल्याचे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष लकी जाधव यांनी लोकमतला सांगितले.आदिवासींच्या सवलती धनगर समाजास लागू केल्यामुळे आदिवासी समाजाचा विश्वासघात केल्याचे त्यांनी सांगितले. धनगर समाजाच्या या सवलती त्वरित रद्द करून घेण्यासाठी या लाँग मार्चमध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आदिवासी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते, आदिवासी नेते, विद्यार्थी तसेच महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.नाशिक येथील गोल क्लब मैदानाहून हा लाँग मार्च सुरू होईल. यामध्ये ठिकठिकाणचे कार्यकर्ते सहभागी होऊन सुमारे २५ ते ५० हजार कार्यकर्ते आदिवासींच्या सवलती वाचवण्यासाठी सहभागी होणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. यासाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या दोन दिवसांपासून ठिकठिकाणी सभा, बैठका घेऊन आज हा निर्णय घेऊन लाँग मार्च निश्चित केला आहे.सभा, बैठकांमध्ये कार्यकर्त्यांनी भाजपा-शिवसेना या सत्ताधारी पक्षांचा जाहीर निषेध करत सरकारचा धिक्कार केला आहे. धनगरांना मुख्यमंत्र्यांनी ज्या आदिवासी योजना लागू केल्या आहे. त्यातील एकही योजनेचा लाभ धनगरांना मिळू देणार नसल्याचा निर्धार या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.>२५ ते ५० हजार कार्यकर्त्यांचा समावेशया लाँग मार्चमध्ये अखिल भारतीय अदिवासी विकास परिषदेचे, राज्यभरातील आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते, युवायुवती, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन सरकारला निर्णय मागे घेण्यास भाग पाडणार असल्याचा निर्धार केल्याचे लकी जाधव यांनी लोकमतला सांगितले. नाशिक येथील गोल क्लब मैदानाहून हा लाँग मार्च सुरू होईल. यामध्ये ठिकठिकाणचे कार्यकर्ते सहभागी होऊन सुमारे २५ ते ५० हजार कार्यकर्ते आदिवासींच्या सवलती वाचवण्यासाठी सहभागी होतील.
धनगर समाजाच्या सवलतींच्या निर्णयाविरोधात उद्या लाँग मार्च
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 12:08 AM