भार्इंदर : भाजपाने यंदाच्या पालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षासाठी (आठवले गट) सोडलेल्या जागांवरील उमेदवारांसाठी भाजपाचे कमळ चिन्ह निश्चित केले आहे. त्यामुळे रिपाइंच्या त्या उमेदवारांबाबत स्वपक्षातच संभ्रम निर्माण झाल्याने पक्षाने प्रभाग-१ मधून दोन उमेदवार अपक्ष म्हणून उभे केले आहेत. त्यावर रिपाइंने लक्ष केंद्रित केले असून उर्वरित तीन प्रभागांतील उमेदवारांचे काय, यावर संभ्रम असल्याची चर्चा पक्षातच सुरू झाली आहे.भाजपाने केंद्रात मंत्रीपद दिल्याने रिपाइंचे राष्टÑीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी यंदाच्या पालिका निवडणुकीत शिवसेनेऐवजी भाजपाला पसंती दिली आहे. त्यांच्या निर्देशानुसार व स्थानिक पातळीवरील पदाधिकाºयांच्या मागणीनुसार यंदाच्या पालिका निवडणुकीत भाजपासोबत युती करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी भाजपाने रिपाइंला काही जागा सोडाव्यात, अशी मागणी स्थानिक पदाधिकाºयांनी केली. त्यावर, सलग तीन दिवस दोन्ही पक्षांत सुरू झालेली चर्चा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी संपुष्टात आली. त्यात प्रभाग ११ मध्ये दोन, १३ व २२ मध्ये प्रत्येकी एक अशा एकूण चार जागा रिपाइंला देण्याचे मान्य केले. त्यापैकी एका उमेदवाराचा अर्ज वेळेत दाखल न झाल्याने तूर्तास तीनच जागा रिपाइंच्या वाट्याला राहिल्या आहेत. परंतु, या जागांवरील उमेदवार रिपाइंऐवजी भाजपाच्या कमळावर निवडणूक लढवत आहेत. यामुळे हे उमेदवार नक्की कुणाचे, हा संभ्रम रिपाइंच्या कार्यकर्त्यांत निर्माण झाला आहे.भाजपाच्या या चाणक्यनीतीला ओळखून रिपाइंचे पदाधिकारी असलेले अॅड. सूर्यकांत लवटे व सुरेश सरोज यांना प्रभाग-१ मध्ये अपक्ष म्हणून उभे केले आहे. रिपाइंच्या पदाधिकाºयांनी या प्रभागावर लक्ष केंद्रित केले असून उर्वरित तीन ठिकाणच्या उमेदवारांना ते पक्षाचेच नसल्याचा दावा करत असहकाराचा पवित्रा घेतला आहे. यावरून रिपाइंमध्येच दोन गट निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली असूनत्यात एक भाजपाच्या युतीला जागणारा व दुसरा रिपाइंचा निष्ठावंत गटाचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.निष्ठावंत प्रभाग-१ मधील उमेदवारांच्या प्रचारफेरीच्या तयारीला लागले आहेत. त्याची गंधवार्ता मात्र भाजपाच्या कमळात बसून रिपाइंचा झेंडा मिरवणाºयांना नसल्याचे सांगितले जात आहे.अॅपसंदर्भात उमेदवारांना मार्गदर्शनराज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व उमेदवारांनी निवडणूक खर्च ट्रू व्होटर या अॅपद्वारे सादर करणे आवश्यक आहे. असे फर्मान निवडणूक प्रशासनाने काढले आहे.उमेदवारांना निवडणुकीतील दैनंदिन खर्चाचा अर्ज भरून तो अॅपमधून डाऊनलोड करावा लागणार आहे. याबाबत निवडणूक आयोगाचे संगणक तज्ज्ञ मुरलीधर भुतडा मार्गदर्शन करणार आहेत. १७ आॅगस्टला सायंकाळी साडेचार वाजता मॅक्सस मॉल बॅन्क्वीट हॉल, ३ रा मजला, भाईंदर (प) येथे प्रशिक्षण होणार आहे.सर्व उमेदवारांनी वेळेत व उपलब्ध अॅपद्वारे आॅनलाइन निवडणूक खर्च वेळेत सादर करावा. त्यासाठी प्रशिक्षणाला उपस्थित रहावे, असे आवाहन पालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. नरेश गीते यांनी केले आहे.सोशल मीडियावरही उमेदवारांचे बॅनरयुद्धपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांनी शहरभर बॅनरबाजी केली असतानाच सोशल मिडियावरही बॅनरयुद्ध सुरू झाले आहे. यामुळे नेटीझन्स मात्र वैतागून गेले आहेत. आपले नाव व चिन्हाचा उल्लेख असलेल्या मतदानयंत्राची प्रतिकृतीही पाठवली जात आहे. मतांसाठी काहीही करण्याची शक्कल उमेदवारांकडून लढवली जात आहे. उमेदवारांनी पक्षनिहाय व्हाटस्अॅप ग्रूपही निर्माण केले आहेत.प्रभाग-१ मधील उमेदवार रिपाइंचे नाहीत. ते अपक्ष असून पक्षाशी त्यांचा काहीही संबंध नाही. त्यांच्या प्रचारासाठी रिपाइंचे जे पदाधिकारी सक्रिय झाले आहेत, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल.- देवेंद्र शेलेकर, जिल्हाध्यक्षभाजपाने रिपाइंसाठी सोडलेल्या जागांवरील उमेदवारांचा संभ्रम आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचाराला जाणे म्हणजे पक्षविरोधी कारवाया असल्याच्या भावना निर्माण झाल्यानेच प्रभाग-१ मध्ये पक्षाचे दोन उमेदवार अपक्ष म्हणून उभे केले आहेत. त्यांच्या विजयासाठी सहकार्य मिळत आहे.-मंगेश होनमुखे, जिल्हा सरचिटणीस
दोन अपक्षांवर रिपाइंची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 5:41 AM