अंबरनाथ : अंबरनाथ पालिकेला स्वत:च्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी वेळ नाही. मात्र खड्ड्यांवरून आमदारांना लक्ष्य केल्यावर एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी हे खड्डे स्वत: न भरता पालिकेला भरण्याची विनंती केली. पालिकेनेही तातडीने रस्ता दुरूस्त करण्याचे काम हाती घेतले. रस्ता दुरूस्त कुणी केला त्यापेक्षा खड्डे बुजल्याचे समाधान नागरिकांना मिळाले आहे.
अंबरनाथमधून जाणारा राज्य महामार्ग हा काँक्रिटचा करण्यात आला आहे. मात्र चारपदरी रस्त्याऐवजी हा रस्ता तीनपदरीच केला गेला. या अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएने पुन्हा निविदा काढल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. असे असले तरी या रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. दोन महिन्यांपासून या रस्त्याच्या देखभालीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे फॉरेस्ट नाक्यावरील डांबरी रस्त्याची अवस्था ही अत्यंत खराब झाली होती. या रस्त्यावरुन गाडी चालविणेही धोकादायक झाले होते. मागील दोन महिन्यात एकदाही या खराब रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आलेले नव्हते. संर्पूण शहरभर या खराब रस्त्याचीच चर्चा सुरू होती. मात्र हा रस्ता खºया अर्थाने चर्चेत आला तो आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना उद्देशून लावलेल्या बॅनरमुळे. खड्डयांकडे लक्ष नाही असे बॅनर लावल्याने वातावरण चांगलेच तापले होते. हा बॅनर जरी काढला गेला तरी या रस्त्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
आमदारांना या प्रकरणात ओढले गेल्याने प्रतिष्ठा जपण्यासाठी अधिकाºयांची धावाधाव सुुरू झाली. रस्ता एमएमआरडीएकडे असल्याने तो रस्ता त्यांनीच दुरूस्त करणे गरजेचे होते. मात्र ते करणे शक्य होत नसल्याने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची सूचना एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी पालिकेच्या अधिकाºयांना केली.हद्दीबाहेर जाऊन कामच्एमएमआरडीएच्या ताब्यातील रस्त्याचे काम पालिका करत असली तरी शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले असतानाही ते भरण्यासाठी पालिकेला वेळ नाहीच्महामार्गाची दुरूस्ती करून पालिकेने आपली तत्परता दाखवली. हद्दीबाहेर जाऊन काम करत सामान्यांना किमत नाही हेच सिद्ध झाले.फॉरेस्ट नाक्याचीच नव्हे तर शहरातील महत्वाच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविणे गरजेचे आहे. नागरिकांचा त्रास कमी करणे गरजेचे आहे. त्या अनुषंंगाने आपण स्थानिक प्राधिकरण आणि अधिकाºयांना निर्देश दिलेले आहेत. - डॉ. बालाजी किणीकर, आमदार