ठाणे : ठाणे महापालिकेच्या उथळसर प्रभाग समिती अंतर्गत सिद्धेश्वर जलकुंभ क्र. १ व २ च्या टाकीच्या अंतर्गत छताच्या भिंतींचे संरक्षणात्मक दुरुस्ती काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचा कालावधी २० दिवसांचा असून, हे काम १ ते २० मार्च २०२१ पर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील खोपट, गोकुळदास वाडी, हंसनगर, परेरानगर, रमाबाई आंबेडकरनगर, लॉरी स्टॅण्ड, चरईतील धोबीआळी, आंबेडकर रोड, चंदनवाडी, पाचपाखाडी, नितीन कंपनी, सर्व्हिस रोड, पाटीलवाडी, भोलाभय्या चाळ, नुरीबाबा दर्गा रोड, अल्मेडा सिग्नल, कोलबाड, विकास कॉम्प्लेक्स व गोकुळनगर या परिसरांना या कालावधीत बायपासपासून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचा दाब कमी असणार असून, नागरिकांनी पाणी जपून वापरावे तसेच महापालिकेच्या कामास सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.
----------------