शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

हापसा न मारता २४ तास पाणी येणाऱ्या बोअरवेलचे पाणी कमी, शिरोळ भागातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 2:54 AM

काही महिन्यांपूर्वी शिरोळ भागात साई पालखी संस्थानने मारलेल्या बोअरवेलला हापसा न मारता २४ तास पाणी येत होते. या घटनेची संपूर्ण तालुक्यात चर्चा होती.

- वसंत पानसरेकिन्हवली -  काही महिन्यांपूर्वी शिरोळ भागात साई पालखी संस्थानने मारलेल्या बोअरवेलला हापसा न मारता २४ तास पाणी येत होते. या घटनेची संपूर्ण तालुक्यात चर्चा होती. आता तालुक्यातील पाणीटंचाई एवढी तीव्र झाली असताना पुन्हा या बोअरवेलला भेट दिली असता तेथील पाणी कमी झाले असून हाताने हापसा मारूनही पाणी कमी प्रमाणात येत आहे.तालुक्यातील खर्डी विभागात पाणीटंचाई नेहमीच तीव्र असल्याने शिरोळ ग्रामपंचायत हद्दीत करंजपाडा गावात मुंबई-नाशिक महामार्गालगत साई पालखी संस्थेने मारलेल्या बोअरवेलला २४ तास पाणी लागल्याने येथील नागरिकांना आशेचा किरण वाटत होता. मात्र, काही महिन्यांमध्येच या बोअरवेलचे पाणी अगदी कमी झाले असून हाताने हापसा मारूनही पाणी कमी येत आहे.ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक हैराण असून तालुक्यातील दोनशेहून अधिक गावपाड्यांत शासनाच्या २५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. वाढते तापमान तसेच पाण्याची खोल गेलेली पातळी यामुळे या भागातील जनतेचे अतोनात हाल होत आहेत.दिगडीचापाडा पाण्यापासून कोसो दूरपाण्याची पातळी खूप खोलवर गेल्याने पाण्याचे स्रोत खूपच कमी झाले आहेत. शिरोळ भागातील लोकांना टँकरने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात आहे. पालकमंत्र्यांनीदेखील येथे पाहणी दौरा केला असून भावली योजनेशिवाय या भागात पर्याय नसल्याचेही सांगितले.- एम. आव्हाड, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती शहापूर

भागतसानगर तालुक्यातील गावपाड्यांत मोठी पाणीटंचाई - जर्नादन भेरेभागतसानगर - तालुक्यातील गावपाड्यांत मोठी पाणीटंचाई असून त्यात सातत्याने वाढ होते आहे. यामुळे तालुक्यातील पाणीप्रश्न अधिकाधिक गंभीर रूप धारण करत आहे.तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गाला लागून असलेला पाडा म्हणजे दिगडीचापाडा. या पाड्यावर १०० च्या आसपास लोकसंख्या आहे. येथे अनेक वर्षांपासून लोक राहत असूनही त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी विहीर नाही किंवा पाण्यासाठी कोणतीही योजना नाही. ज्या कलमगाव ग्रामपंचायतीत हा पाडा येतो, त्याच गावपाड्यांतील नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते आहे.हा पाडा पाणीयोजनेपासून कोसो दूर. त्यामुळे या पाड्यात पाणी देणे शक्यही होणार नाही. या परिसरात विहिरीला पाणीच लागत नाही. पाडा जरी महामार्गाला लागून असला, तरी तो पाणीस्रोतांपासून खूप लांब आहे. त्यामुळे पाड्यात पाणी नाही, मात्र टँकरने पाणीपुरवठा करणे शक्य आहे. या पाड्यातील महिला एक किमी अंतरावरील ओहळावर पाणी भरण्यासाठी जात आहेत. तालुक्यात आज अनेक पाडे पाण्यासाठी वणवण भटकत असले, तरी असेही काही गावपाडे जे महामार्गाला लागून आहेत, त्यांना पाणी नाही. पाणी घेऊन येताना या महिलांना रस्ता क्रॉस करावा लागतो. वाहनांपासून बचाव करतच त्यांना यावे लागते. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठयाची मागणी महिलांनी केली आहे. येत्या काही दिवसांत ही पाणीटंचाई अधिक तीव्रता निर्माण करेल, अशीच चिन्हे दिसत आहेत.आज पाण्याची समस्या गंभीर असून प्रत्येकाला पाणी मिळण्यासाठी टँकरचा प्रस्ताव दिलेला आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना व्हायला हवी.- अविनाश भोईर,ग्रामपंचायत सदस्यआमच्यापर्यंत प्रस्ताव आल्यानंतर त्यावर तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. - एम.बी. आव्हाड, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :thaneठाणे