शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

मधुकर मोहापे, माधुरी भोईर यांना जिल्हास्तरीय कृषिभूषण पुरस्कार

By admin | Published: July 03, 2017 6:21 AM

माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाद्वारे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाद्वारे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात कल्याण तालुक्यातील आणे येथील मधुकर धर्माजी मोहोपे यांना कृषिभूषण पुरस्कार, तर भिवंडीच्या वेहेळे येथील माधुरी महादेव भोईर यांचा जिजामाता कृषिभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रगतशील शेतकऱ्यांना जिल्हास्तरीय कृषिभूषण व जिजामाता कृषिभूषण पुरस्काराने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी गौरवण्यात आले. जिल्हा नियोजन भवनात पार पडलेल्या कार्यक्रमप्रसंगी आमदार रवींद्र फाटक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय, कल्याणचे कान्हा लोणे, भिवंडीचे विनायक पाटील, आकाश बरफ, अंबरनाथमधील सदानंद सुरोशे, सुरेश हंबीर, अमित बसवंत, किसान पारधी (शहापूर), मोतीराम कडव, दत्तू शीद (मुरबाड) या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती तसेच उत्तम प्रकारे भाजीपाला पिकवणे, शासनाच्या योजनांचा लाभ घेणे, कृषी यांत्रिकीकरण, कृषी पर्यटन इत्यादी कारणांसाठी गौरवण्यात आले.जिल्ह्यात शेतीमध्ये विविध प्रयोग झाले पाहिजेत, तसेच केवळ भातावर अवलंबून न राहता भाजीपाला तसेच इतर पिके कशी घेता येतील, हे पाहिले पाहिजे, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. ठाणे जिल्ह्यात जलयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनीदेखील आपल्या भाषणात जिल्हा परिषद शेती आणि शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. याप्रसंगी कृषीविषयक पुस्तिकांचे विमोचन करण्यात आले. भाजीपाला लागवड, रोगनियंत्रण अशी माहिती या पुस्तिकेत आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते पीओएस मशिन्सचे वाटपही झाले. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, जिल्हा अधीक्षक महावीर जंगटे उपस्थित होते.