ठाणे : गुरुवारी पाऊस कोसळताच छत्र्यांच्या दुकानांसमोर ठाणेकरांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसले. प्रिंटेड छत्र्यांच्या ट्रेण्डसह वाहनांसाठीही छत्र्या आल्याने त्यांचीही तुफान खरेदी सुरू आहे. लहान मुलांसाठी आलेली मोदकछत्री हे यंदाचे आकर्षण आहे.गेल्या वर्षीपेक्षा यंदा छत्र्यांच्या खरेदीला लवकर सुरुवात झाली आहे. पावसापासून संरक्षण करणाऱ्या या छत्रीच्या खरेदीला मे च्या शेवटच्या आठवड्यापासून हळूहळू सुरुवात झाली असली तरी गुरुवारी मात्र गर्दीचा महापूरच दिसून आला.दरवर्षी नियमित मिळणाºया थ्री फोल्ड, टू फोल्ड छत्र्यांबरोबर आता ग्राहकांना आकर्षित करणाºया नवीन आकार आणि प्रकारांच्या छत्र्या आल्या आहेत. कोरिओ प्रिंट, फुल्ली आॅटोमॅटिक कारछत्री, फाइव्ह फोल्ड, ज्येष्ठांसाठी वॉक स्टिक अशा विविध प्रकारांच्या छत्र्या आहेत. तरुणाईसाठी लक्ष वेधून घेणाºया छत्र्यांसह लहान मुलांचे नेहमीच आकर्षण असलेल्या कानवाल्या छत्र्यांमध्ये वेगवेगळ्या प्रिंट्स पाहायला मिळतात.अर्धे कापड आणि अर्धे प्लास्टिक अशा प्रकारामध्ये लहान मुलींसाठी छत्री आहे. ही छत्री गुलाबी रंगात असल्याने लहान मुलींना आकर्षित करते. प्रिन्सेस, बार्बी डॉल, सिंड्रेला, बेटन्टेन, स्पायडरमॅन यासारख्या कार्टुनच्या छत्र्याही आहेत. फ्रिलच्या छत्र्यांमध्ये १२ रंग आहेत. मोठ्यांच्या छत्र्यांची किंमत २५० ते ७५० तर लहान मुलांच्या छत्र्यांची किंमत १५० ते ३०० रुपये आहे.रंग पाहूनही होत आहे खरेदी : छत्र्यांची खरेदी करताना त्याचा दर्जा पाहून खरेदी केली जाते. परंतु, यंदा छत्र्यांमध्ये आलेल्या आकर्षक रंगांनी महिलावर्गाला भुरळ घातली आहे. तरुणींनी खरेदी करताना रंगावर भर दिला आहे. रेन्बो प्रिंटेड छत्री लक्ष वेधून घेत आहे. कपड्यांप्रमाणेच पारखून छत्री खरेदी केली जात आहे.कारसाठी रिव्हर्स छत्रीकारसाठी यंदा ७०० रुपयांची रिव्हर्स छत्री बाजारात आली आहे. ती उलटीदेखील करता येते, हे तिचे वैशिष्ट्य. २८ इंचांची ही छत्री डबल कापडाची आहे. फ्लोरल प्रिंट्स, पिकॉक डिझाइन्स मिळतात.