- शिल्पा कुलकर्णी-मोहिते
आपल्या सभोवतालचे तंत्रज्ञान जितक्या झपाट्याने बदलत आहे, आविष्कार आणि चमत्कार या दोन शब्दातील अंतर तितक्याच झपाट्याने कमी होत आहे. तुम्ही हॉलिवूडच्या अॅक्शन फिल्म्स्मध्ये बघितले असेल, नायक डोळ्यात लेन्स घालतो आणि त्याला सगळी माहिती डोळ्यासमोर दिसू लागते. काहीसे असेच तंत्रज्ञान आता गॅजेटप्रेमी ग्राहकांसाठी बाजारात उपलब्ध झाले आहे, ज्याला ए.आर. म्हणजे आॅगेमेंटेड रीयालिटि ग्लासेस म्हणतात. मूलत: हा एक विशेष चष्म्यासारखा दिसणारा चष्मा असतो. हा चष्मा जेव्हा स्मार्ट फोनला कनेक्ट केला जातो तेव्हा सुरू होते या चष्म्यातली खरी जादू.
ए.आर. चष्म्याची काच साधारण काच नसून चष्म्याला स्मार्ट बनवणारा एक कंबायनर असतो. नावाप्रमाणेच कंबायनर डोळ्यांनी बघता येणारी वास्तविकता आणि फोनकडून आलेली डिजिटल माहिती एकत्र करण्याचे काम करतो. जेव्हा तुम्ही ए.आर. चष्मा घालता तेव्हा तुम्हाला दुहेरी स्त्रोताच्या प्रतिमा दिसतात. एका लेन्समधून नैसर्गिक प्रकाशामुळे दिसणाऱ्या बाहेरील वास्तविक जगाची प्रतिमा आणि दुसरी डिजिटल प्रतिमा. वास्तविक जगाची प्रतिमा टिपण्यासाठी चष्म्यावर एक कॅमेरा बसवलेला असतो. कंबायनर या दोन प्रतिमा एकत्र करून ओलेड किंवा एलईडी डिस्प्लेवर प्रदर्शित करतो. पण या चष्म्याच्या बºयाच मर्यादा आहेत. दिसणारी प्रतिमा कॅमेºयाच्या रेंज आणि क्लॅरिटीवर अवलंबून असते.
या मर्यादा ओलांडण्यासाठी काही कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञानाने बनवलेले चष्मे आणले आहेत, जे बरेचसे साधारण चष्म्यासारखे दिसतात. पण त्याच्या एका बाजूच्या काचेवर बसवलेली असते एक खास होलोग्राफिक फिल्म. यांना फोकल किंवा होलोग्राफिक ग्लासेस असेही म्हणतात. मजकूर आणि प्रतिमा तयार करण्यासाठी चष्म्याच्या बाजूला एक लेझर प्रोजेक्टर असतो. हा प्रोजेक्टर लाल, हिरवा आणि निळा असे तीन रंगाचे किरण निर्माण करतो. हे तीन रंग वेगवेगळ्या प्रमाणात एकत्र करून कोणताही रंग तयार होऊ शकतो. प्रोजेक्टरमधून लेझर किरणे बाहेर पडण्यापूर्वी त्याला काही अंशांनी वाकवले जाते, ज्यामुळे ही किरणे नेमकी होलोग्राफिक फिल्मवर पडतात. होलोग्राफिक फिल्म एखाद्या आरशासारखी काम करते आणि ती किरणे डोळ्याकडे वळवून आपल्याला मजकूर किंवा प्रतिमा दर्शविते. पूर्वीच्या डिजिटल स्क्रीनच्या विपरीत, फोकल्सवरील मेसेज केवळ त्याच्या धारकाच्या डोळ्यालाच दिसू शकतो, ज्यामुळे सार्वजनिक ठिकाणी देखील गोपनीयता पाळता येते.
स्मार्ट फोनवरील माहिती फोन न उचलता तुमच्या डोळ्यासमोर येऊ शकते. फोकल्स नियंत्रित करण्यासाठी एक छोटी अंगठी वापरता येते. ही अंगठी एखाद्या कॉॅम्प्युटरच्या माऊससारखे काम करते. यावरच्या बटणाने हवे तेव्हा चष्म्यावरचे मजकूर दिसणे बंद, चालू करता येते. काही चष्म्यांना जोडलेले इअर फोन आणि माइकदेखील असतात, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता अजून वाढते. फोकल्सचा उपयोग नेव्हिगेशन म्हणजे रस्ता शोधण्यासाठीदेखील केला जाऊ शकतो.
लवकरच भविष्यात व्हिज्युअल रिकॅग्निशन आणि फेस रिकॅग्निशनसारख्या तंत्रांबरोबर हे चष्मे जोडले जातील. मग टुरिस्ट जागांवर त्या जागेबद्दल माहिती सांगण्याचे गाइडचे काम हे चष्मेच करतील किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तिला भेटताच, त्याचे नाव, गाव, आवडी, निवडी आणि बरचं काही निव्वळ सेकंदात तुमच्या डोळ्यासमोर येईल, इतक्या सहज मिळणाºया माहितीमुळे कदाचित निर्णय घेणे सोपे होईल किंवा अतिमाहितीमुळे गोंधळाचे होईल. (लेखिका या टेक्नोक्रॅट आहेत.)तंत्रज्ञानाचा आविष्कार आपण सारे अनुभवत आहोत. तंत्रज्ञानामुळे आपले जगणेच बदलून गेले आहे. गॅजेटप्रेमी ग्राहकांसाठी आता तर ए.आर. म्हणजे आॅगेमेंटेड रीयालिटि ग्लासेस बाजारात आले आहेत. विशेष चष्म्यासारखा दिसणारा हा चष्मा जेव्हा स्मार्ट फोनला कनेक्ट केला जातो तेव्हा सुरू होते या चष्म्यातली खरी जादू आणि लक्षात येते ती तंत्रज्ञानाची कमाल. या चष्म्याला स्मार्ट बनवणारा एक कंबायनर असतो. नावाप्रमाणेच कंबायनर डोळ्यांनी बघता येणारी वास्तविकता आणि फोनकडून आलेली डिजिटल माहिती एकत्र करण्याचे काम करतो.