भाईंदर : भाजपाला शह देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या मीरा-भार्इंदर संघर्ष मोर्चाने बहुजन विकास आघाडीसोबत आघाडी केली आहे. राष्टÑवादीने उमेदवारांना स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्याने संघर्ष मोर्चाची राष्टÑवादीसोबत होणारी आघाडी अद्याप चर्चेत अडकली आहे. जागावाटपावर घोडे असल्याचे समजते. निवृत्त पालिका आयुक्त शिवमूर्ती नाईक व उद्योगपती राजेंद्र मित्तल यांचे पाठबळ मिळाले असून निवडणुकीची रणनीती आखण्याची जबाबदारी माजी नगरसेवक मिलन म्हात्रे व ओमप्रकाश गाडोदिया यांच्याकडे आहे. मोर्चाने जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्यात शहरातील राजकीय एकाधिकारशाही मोडून काढण्यासह शहराच्या समस्या सोडवणे व सुनियोजित शहराचा विकास आदी मुद्यांचा समावेश केला आहे. जाहीरनाम्यातील संकल्प पूर्ण करण्यासाठी मोर्चाने राजकीय पाठबळासाठी शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा केली. त्याला सेनेकडून नकारात्मक प्रतिसाद मिळाला असला तरी पाठिंब्याकडे मोर्चा आशेने पाहत आहेत. पाठिंबा न मिळाल्यास मोर्चातील दिग्गजांची फौज सर्व ताकीदीनिशी निवडणुकीत उतरणार आहे. तत्पूर्वी मोर्चाने बहुजन विकास आघाडीसोबत आघाडी केली असून राष्टÑवादीशी आघाडीबाबत चर्चा सुरु आहे. राष्टÑवादीची वाट खडतर झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे किती उमेदवार निवडणूक लढवणार हे कळले नाही. मोर्चा सध्यातरी २१ जागा लढवणार आहे.
महाआघाडीचे घोडे जागावाटपावर अडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:29 AM