शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'माझ्या वडिलांना कुणी त्रास दिला याचं योग्यवेळी उत्तर देऊ'; रोहित पाटलांचा रोख कुणाकडे?
2
विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापूर! १५ दिवसात जप्त केलेला आकडा पाहून थक्क व्हाल
3
शरयूच्या तीरावर 25 लाख दिव्यांची रोषणाई; उजळून निघाली श्रीरामाची अयोध्या नगरी...
4
सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध
5
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
6
Petrol-Diesel Prices : खुशखबर! सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पंपमालकांनाही दिवाळीचं गिफ्ट
7
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
8
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
9
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
10
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
11
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
13
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
14
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
15
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
16
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
17
मोठी बातमी: निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत तब्बल १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
18
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
19
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
20
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध ठाण्यामध्ये उद्धवसेनेचे ‘दिघे कार्ड’

By अजित मांडके | Published: October 29, 2024 10:27 AM

Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्र्यांचे मताधिक्य वाढणार?; मनसेकडून उमेदवार नाही

Maharashtra Assembly Election 2024 : ठाणे : कोपरी-पाचपाखाडी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून ते चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी त्यांची लढत उद्धवसेनेचे केदार दिघे यांच्याशी होत आहे. केदार हे स्व. आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. दिघे यांच्या पुतण्याला उमेदवारी देण्याची उद्धवसेनेची खेळी कितपत यशस्वी ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मनसे या ठिकाणी आपला उमेदवार न देता, मैत्री निभावणार, असे स्पष्ट संकेत आहेत. कोपरी - पाचपाखाडीतून प्रत्येक वेळी शिंदे यांचे मताधिक्य वाढत आहे.

यावेळी ते मुख्यमंत्री असल्यामुळे आणखी वाढणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. २००९ मध्ये शिंदे येथून पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. शिवसेना दोन गटांत विभागल्याने उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना असा सामना रंगणार आहे. यापूर्वी या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत होत होती. या वेळेस काँग्रेसकडून हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यात उद्धवसेनेला यश आले.

स्व. आनंद दिघे यांचे शिष्य असलेल्या शिंदे यांच्या विरोधात दिघे यांचे पुतणे केदार दिघे लढत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिंदे यांच्यासोबत वरचेवर भेटीगाठी सुरू असतात. त्याचा परिपाक म्हणून मनसेने शिंदे यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मराठी मतांचे विभाजन टळेल व शिंदे विरुद्ध दिघे थेट लढत होईल. 

निवडणुकीतील कळीचे मुद्देमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा बालेकिल्ला असून, त्यांना या मतदारसंघातून निर्णायक लीड घ्यावा लागणार. शिंदेंसमोर ‘दिघे कार्ड’ खेळविण्याची रणनीती यशस्वी होणार का, याची चर्चा सुरू आहे.या भागात सर्वांत मोठी एमआयडीसी आहे. मात्र, येथील उद्योगधंदे बंद पडले आहेत. क्लस्टरच्या माध्यमातून सुरू झालेला विकास अद्याप पूर्णत्वाकडे गेलेला नाही. कोळीवाड्यांचा प्रश्न, मैदानांचा अभाव, वाहतूककोंडी सुटू शकलेली नाही. 

लोकसभेमध्ये काय घडले; परिणाम काय?     लोकसभेमध्ये शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना अशीच लढत झाली होती. शिंदेसेनेकडून नरेश म्हस्के तर उद्धवसेनेकडून राजन विचारे रिंगणात होते. म्हस्के यांना कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून निर्णायक लीड मिळाला होता.    २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचे नरेश म्हस्के यांना १ लाख ११ हजार १३५ मते मिळाली तर, उद्धवसेनेचे राजन विचारे यांना ६६ हजार २६० मते मिळाली.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेkopri-pachpakhadi-acकोपरी-पाचपाखाडी