शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस!"; आई सरिता फडणवीस यांचं मोठं विधान
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: संस्थान खालसा! विनोद तावडेंना घेरणारे हितेंद्र, क्षितिज ठाकूर पडले; वसई-विरारमध्ये ‘कमळ’ फुलले!
3
भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार; गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुखांचा विजय; मानसिंगराव नाईकांना किती मत मिळाली?
5
अंधेरी पूर्वेत शिवसेनेच्या मुरजी पटेलांची बाजी, उबाठाच्या ऋतुजा लटकेंचा पराभव 
6
Vikhroli Vidhan Sabha Result 2024: संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊतांचा निकाल काय?
7
Maharashtra Assembly Election Result 2024: अमित ठाकरेंचा दारूण पराभव, बाळा नांदगावकरही हरले; राज ठाकरेंवर उद्धव ठाकरे भारी पडले
8
प्रणिती शिंदेंना मोठा धक्का! त्यांच्याच मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार पडला; भाजपने बालेकिल्ला फोडला
9
काय झाडी, काय डोंगर... शिंदेंचा ५० आमदारांपैकी एक पडला; शहाजीबापू पाटलांचा पराभव
10
Maharashtra Assembly Election Result 2024: कांदिवली पूर्वेतून भाजपच्या अतुल भातखळकरांची हॅटट्रिक, काँग्रेसच्या कालू बढेलियांचा पराभव
11
ठरलं! 'या' दिवशी राज्यात स्थापन होणार महायुतीचं सरकार; कोण होणार मुख्यमंत्री?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचे काय झाले? इस्लामपूरमध्ये महायुती की मविआ जिंकले
13
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: लोह्यामध्ये मतमोजणी दरम्यान दगडफेक; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "एका राजपुत्रासाठी आम्ही थांबलो तर..."; सुषमा अंधारेंचं विधानसभा निकालाबाबत मोठं विधान
15
चौरंगी लढतीत दीपक केसरकरांची बाजी, मोठ्या मताधिक्यासह मिळवला विजय 
16
एकनाथ शिंदेंची जोरदार मुसंडी; एकट्याने ठाकरे, पवार, कांग्रेसपेक्षा जास्त जागांवर घेतली आघाडी
17
चारकोपमध्येही भाजपची सरशी, योगेश सागर यांचा विजय जवळपास निश्चित
18
Chitra Wagh : "महायुतीच्या विजयाचे शिल्पकार", स्पष्ट बहुमत दिसताच चित्रा वाघ यांचं ट्विट!
19
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे 'नितीशकुमार' ठरणार की फडणवीसांसारखे युद्ध जिंकूनही हरणार? CM कोण होणार...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: एक्झिट पोल पुन्हा ठरले फोल! महायुतीला कौल दिला, पण ‘त्सुनामी’चा अंदाज नाही आला!

विचारे यांच्या उमेदवारीने ठाण्याची लढत झालीय रंगतदार

By अजित मांडके | Published: November 09, 2024 4:15 PM

Maharashtra Assembly Election 2024: ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ ताब्यात राखण्यासाठी यावेळी भाजपला कसरत करावी लागणार की, सहजपणे भाजप ही लढाई जिंकणार, याची उत्सुकता आहे.

- अजित मांडके ठाणे  - ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ ताब्यात राखण्यासाठी यावेळी भाजपला कसरत करावी लागणार की, सहजपणे भाजप ही लढाई जिंकणार, याची उत्सुकता आहे. मागील निवडणुकीत भाजपचे संजय केळकर यांना मनसेचे आव्हान होते; परंतु आताच्या निवडणुकीत उद्धवसेनेकडून माजी खा. राजन विचारे यांना संधी दिल्याने येथील लढत आता रंगतदार होणार आहे.

२०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत केळकर यांच्यासमोर मनसेचे अविनाश जाधव होते. त्यावेळेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने उघडपणे तर शिवसेनेने छुपी मदत मनसेला केली होती. तरीसुद्धा केळकर यांनी जाधव यांचा २० हजार मतांनी पराभव केला. आता केळकर यांची लढत केवळ मनसेबरोबर नसून उद्धवसेनेचे राजन विचारे यांच्याशीसुद्धा असणार आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुतीला १ लाख २६ हजार ४३१ मते मिळाली. विचारे यांना ६६ हजार २६० मते मिळाली. विधानसभा निवडणुकीत महायुती हे मताधिक्य राखते का? लोकसभेत मिळाली तेवढी किंवा त्यापेक्षा जास्त मते विचारे प्राप्त करतात का? मनसे केळकर की विचारे यापैकी कुणाची मते खाणार? यावर निकाल निश्चित होईल. 

मतदारसंघातील कळीचे मुद्दे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पार्किंगची समस्या असल्याने वाहतूककोंडी सुटू शकलेली नाही.जुन्या धोकादायक इमारतीचा पुनर्विकासाचा प्रश्न गंभीरघोडबंदर भागात होणारी वाहतूककोंडी डोकेदुखीया मतदारांचा कौल कुठे? - २ लाख ६० हजारांच्या आसपास हिंदू मते आहेत. त्यातील ९५ हजारांच्या आसपास मराठा समाजाची मते आहेत आणि हीच मते या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. - ३दोन मराठा उमेदवार असल्याने मतदार नेमके कुणाला मतदान करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thane-acठाणे शहरrajan vichareराजन विचारे