शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

नावात घोळ, ईव्हीएम बिघाडामुळे नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 2:55 AM

Maharashtra Election 2019: परेरानगरातील मतदानकेंद्रावर स्वच्छतागृहाचाही अभाव

- जितेंद्र कालेकरठाणे : कोपरी-पाचपाखाडी आणि ओवळा-माजिवडा या मतदारसंघांतील अनेक मतदानकेंद्रांमध्ये मतदारांच्या नावांतील घोळ आणि मतदानयंत्रांतील बिघाडामुळे मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर, दिव्यांग मतदारांसाठी तळमजल्यावर मतदानकेंद्र असल्यामुळे या मतदारांनी समाधान व्यक्त केले.

कोपरीतील वनविभागाच्या वसाहतीमध्ये ३६३ ते ३६५ ही तीन मतदानकेंद्रे होती. याठिकाणी करण भोईर यांचे नाव ३६३ ऐवजी ३५२ मध्ये आल्यामुळे त्यांना बराच मनस्ताप सहन करावा लागला. सकाळी ११ ते १२ या दरम्यान या दोन्ही ठिकाणी आपले नाव शोधण्यातच त्यांना बराच वेळ खर्च करावा लागला. ३६३ मध्येच स्वाती सावे या शिक्षिकेचे नाव स्वाती साबे असे मतदारयादीत प्रसिद्ध झाले होते. अनेकांनी निवडणूक आयोगाच्या आवाहनानंतर मतदारांच्या पुनर्नोंदणीत नावाचा समावेश करूनही त्यांचे नाव मतदारयादीत आले नसल्याचे कोपरीतील शिवसेना कार्यकर्त्या नीलम भोईर यांनी सांगितले.

याच परिसरातील अनंत नागेश नार्वेकर यांच्या मुलाचे नावही सचिन अनंत गलगले (४५) असे मतदारयादीत आले. नार्वेकर हे कोपरीतील विजयनगर येथे वास्तव्याला असून त्यांनाही मतदानासाठी अनेक पुराव्यांची जमवाजमव करताना दमछाक झाली. नाशिक येथून ठाण्यातील मतदारयादीत नाव नोंदविलेल्या मुकुंद खुटे यांनाही बऱ्याच परिश्रमानंतर आपले नाव मिळाले. त्यानंतर, त्यांनी वनविभागाच्या मतदानकेंद्रावर मतदान केले.

ब्राह्मण विद्यालयात तांत्रिक बिघाड, अर्धा तास मतदान बंद

ओवळा-माजिवडा मतदारसंघातील वर्तकनगर येथील ब्राह्मण विद्यालयातील मतदानकेंद्र क्रमांक ३६३ येथील मतदानयंत्रामध्ये दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बिघाड झाला होता. त्यामुळे भीमा राठोड यांच्यासह १० ते १५ जणांना, तर ३५८ क्रमांकाच्या मतदानकेंद्रावर पोपट सोनवणे यांच्यासह २० ते २५ जणांना अर्धा ते एक तास ताटकळत उभे राहावे लागले.

सुमारे अर्ध्या तासाच्या अंतराने येथील ईव्हीएमयंत्र बदलण्यात आले. त्यानंतर मतदानप्रक्रिया सुरळीत झाली. एकाच ठिकाणी दोन ते तीन वेळा मतदानयंत्रांत बिघाड झाल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेविका विमल भोईर आणि मनसेचे शाखाध्यक्ष संतोष निकम, प्रसाद भांदीगरे यांनी मतदानकेंद्र अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली. अनेकांनी या केंद्रावर वेळ वाढवून देण्याचीही मागणी केली. ती मान्य केल्यानंतर वातावरण निवळले.

स्वच्छतागृहाचीही असुविधा : ओवळा-माजिवडा मतदारसंघातील लोकमान्यनगरपाडा क्रमांक-३, परेरानगर येथील द्रौपदीबाई इंदिसे शाळेतील मतदानकेंद्रावर स्वच्छतागृहाचीही सुविधा नसल्याने त्याठिकाणी असलेल्या महिला अधिकारी, कर्मचारी यांनी मतदानकेंद्राध्यक्षांकडे याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

एकीकडे सखी मतदानकेंद्रांची संकल्पना राबविण्यात येत असताना, अशा गैरसोयींमुळे महिला कर्मचाºयांची कुचंबणा होते. या बाबींकडेही निवडणूक यंत्रणेने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची तक्रार येथील महिला कर्मचाºयांनी सोमवारी पहाटे ५.३० वाजताच केली. त्यामुळे मतदान सुरू होण्यापूर्वीच आपल्याच कर्मचाºयांची समजूत काढण्याची वेळ येथील अधिकाºयांवर आली होती.

१0८ वर्षीय विठाबार्इंचे मतदान : ठाणे पूर्वेतील कोपरी गावातील १०८ वर्षीय विठाबाई दामोदर पाटील या आजीबार्इंनीही गावातीलच शाळा क्रमांक १६ या मतदानकेंद्रावर सोमवारी सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला. अनेकदा कोणतेही कारण नसताना तरुण मतदार मात्र मतदानामुळे काय होणार आहे, अशी लंगडी सबब पुढे करून मतदानापासून चार हात लांब राहतात. अशा नवमतदारांसमोर या १०८ वर्षीय विठाबार्इंनी मात्र एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान