शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

Maharashtra Election 2019: ठाणेकरांची मतदानाकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 5:13 AM

Maharashtra Election 2019: भिवंडीत मनसे उमेदवाराची गाडी फोडली.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मतांची टक्केवारी वाढावी, याकरिता केलेल्या प्रयत्नानंतरही ठाणेकरांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचेच चित्र आहे. उच्चभ्रूंच्या वस्त्यांमधील मतदार अभावाने मतदानाला बाहेर पडले तर झोपडपट्ट्या, गावठाणांमधून तुलनेने अधिक मतदान झाले. मात्र लोकसभेला दिसला तेवढाही उत्साह विधानसभेला दिसला नाही. भिवंडीत मनसेच्या उमेदवाराच्या मोटारीची अनोळखी व्यक्तींनी केलेली तोडफोड व ठाण्यात मतदान केंद्रात झालेली शाईफेकीची घटना वगळता जिल्ह्यात मतदान शांततेत पार पडले.

जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक रिंगणातील २१२ उमेदवारांचे नशीब ईव्हीएम मशीन्समध्ये सोमवारी लॉक झाले. २०१४ च्या निवडणुकीत ५९ लाख ९० हजार ७३४ मतदारांपैकी ५०.६१ टक्के मतदारांनी त्यांचा हक्क बजावला होता. यावेळी मतांची टक्केवारी त्याच्याच आसपास राहण्याची चिन्हे आहेत.

भिवंडी पूर्वचे मनसेचे उमेदवार मनोज गुळवी यांच्या गाडीची रविवारी रात्री अनोळखी व्यक्तींनी तोडफोड केली. सोमवारी ठाण्यातील एका मतदानकेंद्रावर बहुजन नेते सुनील खांबे यांनी केलेली शाईफेकीची घटना आणि मतदानयंत्रातील बिघाडाचे काही प्रकार वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान झाले.

यंदाच्या निवडणुकीत ६३ लाख ९२ हजार ३५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणे अपेक्षित होते. गेले दोन दिवस ठाण्यात पाऊस पडत होता. पण सोमवारी चक्क ऊन पडले होते. मात्र तरीही घोडबंदर रोड व तत्सम उच्चभ्रू वस्त्यांमधील मतदान केंद्रावर तुरळक मतदार आढळले. त्याचवेळी मुंब्रासारख्या परिसरातील मतदान केंद्रांवर गर्दी होती.

मात्र तेथील अनेक मतदारांकडे तीन- तीन ओळखपत्रे मागितली जात असल्याने मतदारांमध्ये नाराजी होती. रविवारला जोडून मतदान असल्याने काही मतदारांनी चक्क पर्यटनस्थळ गाठले होते. त्यामुळे शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर मतदार तेवढेच मतदानाला घराबाहेर पडल्याचे चित्र होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत जेमतेम चार ते पाच टक्के मतदान झाले असल्याने अनेक उमेदवार, त्यांचे कुटुंबीय व कार्यकर्ते वेगवेगळ््या विभागात जाऊन मतदारांना मतदानाकरिता घराबाहेर पडण्याची विनंती करीत होेते.जिल्ह्यात सर्वपक्षीय नेते, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्यासह मराठी मालिका आणि चित्रपटातील अनेक कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला व मतदानाचे आवाहन केले. मात्र तरीही जवळपास निम्मे ठाणेकर मतदार घरातून बाहेर पडले नाहीत.

रायगडच्या ग्रामीण भागांत मतदारांचा चांगला प्रतिसाद

अलिबाग : शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मतदारांनी दाखविवेल्या उत्साहामुळे रायगड जिल्ह्याचा मतदानाच टक्का ६५ टक्क्यांवर गेला. तो मागील वर्षीच्या तुलनेत घटलेला आहे. काही दिवस पाऊस पडत असल्याने मतदानाच्या दिवशी पाऊस खोळंबा करणार, अशी चिंता उमेदवार- कार्यकर्त्यांना होती. मात्र पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने मतदारांना विनाव्यत्यय घराबाहेर पडून मतदान करता आले. दुपारी उन्हाचा तडाखा चांगलाच वाढल्याने मतदारांना जोर थोडा कमी झाला.

उन्हे उतरताच पुन्हा मतदान वाढले. रेवस-बोडणी परिसरातील मासेमारी करण्यासाठी गेलेले मासेमार रविवारी सायंकाळीच मतदानासाठी परतले होते. त्यामुळे किनाऱ्याला सुमारे ५०० बोटी नांगरुन ठेवल्या होत्या. अलिबाग, पेण, महाड आणि श्रीवर्धन या मतदारसंघातील चाकरमानीही रविवारीच परतले होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदानthane-acठाणे शहर