शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

मीरा भाईंदर मतदार संघात भाजपात बंडाचे वारे; माजी महापौर गीता जैन भरणार उमेदवारी अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 9:26 PM

मीरा-भाईंदर विधानसभा निवडणूक 2019 - मीरा भाईंदर महापालिकेत एकहाती वर्चस्व ठेवणारे भाजपा आमदार मेहता हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे समजले जातात.

मीरारोड - मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघातुन भाजपाने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे जवळचे असलेले विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांना उमेदवारी दिल्याने भाजपाच्या माजी महापौर गीता जैन यांनी देखील अपक्ष म्हणून निवडणुक लढवण्याची तयारी चालवली आहे. येत्या शुक्रवारी त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांच्या निकवर्तियांनी स्पष्ट केले आहे. मीरा भाईंदर महापालिकेत एकहाती वर्चस्व ठेवणारे भाजपा आमदार मेहता हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे समजले जातात. मुख्यमंत्री देखील मेहतांच्या आग्रहावरुन शहरात सुमारे १५ वेळा तरी येऊन गेले आहेत. मुख्यमंत्र्यांचाच वरदहस्त असल्याने महापालिकेसह पोलीस, महसुल, नगरविकास आदी सर्वच विभागात मेहतांचे चांगलेच वजन आहे. स्थानिक नगरसेवक व पदाधिकारायांवर देखील त्यांचा धाक आणि पकड आहे. त्यामुळे उघडपणे गीता जैन यांना समर्थन देण्यास अनेकजण धजावत नाहित हे देखील वास्तव आहे. परंतु भाजपाचे अनेक जुने - नवे निष्ठावान कार्यकर्ते मात्र मेहतांच्या कार्यपध्दतीवर नाराज आहेत. ते उघडपणे मेहतांच्या विरोधात आहेत. तर काही नगरसेवक - पदाधिकारी देखील आतुन त्यांच्या पासुन नाराज असले तरी उघडपणे नाराजी व्यक्त करण्याचे धाडस दाखवत नाहीत असे सुत्रांचे म्हणणे आहे. विविध प्रकरणां मुळे मेहता नेहमीच वादाच्या भोवरायात राहिले आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिमा नागरीकां मध्ये देखील चर्चेचा विषय ठरली आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत देखील भाजपाचे पॅनल असुनही जैन यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न झाला होता. पण तरी देखील जैन यांनी पालिकेच्या भाईंदर पश्चिम येथील प्रभाग ६ मधुन तब्बल ९ हजार ९०० मतं मिळवली होती. पालिका निवडणुकीतील सर्वात जास्त मतं मिळवणाराया त्या उमेदवार ठरल्या. जैन यांनी भाजपात आणि शहरात मेहतांना स्वत:च्या रुपाने पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. जैन यांचा वाढता प्रभाव हा मेहता व समर्थकांना नेहमीच खटकत आला आहे. त्यामुळेच जैन यांच्यावर सोशल मिडीयावरुन अपशब्दात टिप्पणी करण्यासह त्यांचे जाहिरात फलक काढणे, त्यांच्या नवरात्रीचा कार्यक्रम दबावाखाली बंद करायला लावणे , पक्षाच्या कार्यक्रम - बैठकांना न बोलावणे आदी प्रकार नागरीकांनी अनुभवले आहेत. जैन यांनी देखील विधानसभा निवडणुकीची त्या २०१५ साली महापौर असताना पासुनच तयारी चालवली होती. पक्षाचे निरीक्षक आले असता त्यांनी उमेदवारीची मागणी केली होती. उमेदवारीसाठी त्यांनी राज्यातल्या नेत्यां पासुन दिल्लीतील नेत्यांच्या भेटीगाठी चालवल्या होत्या. परंतु मुख्यमंत्री यांची मेहतांशी असलेली जवळीक पाहता मेहतांची उमेदवारी प्रतिष्ठेची होती. त्यामुळे अपेक्षे प्रमाणे मेहतांना उमेदवारी मिळाली असल्याने आता जैन यांच्या समोर अपक्ष म्हणुन उभे राहण्याचा वा अन्य पक्षात जाण्याचा पर्याय असल्याचे जाणकारांचे मत आहे. जैन यांनी अद्याप आपले पत्ते खुले केले नसले तरी त्या शुक्रवार ४ ऑक्टोबर रोजी अपक्ष म्हणुन उमेदवारी अर्ज भरतील असे निश्चीत असल्याचे त्यांच्या निकवर्तियांनी सांगीतले. मेहतांना एबी फॉर्म दिला असला तरी जैन यांचे भाजपाची उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न सुरुच असल्याचे सुत्र म्हणाले. पण जमलेच नाही तर अपक्ष म्हणुन मैदानात उतरण्याची त्यांची तयारी आहे. जैन यांच्या उमेदवारी मेहतांसाठी डोकेदुखी ठरणार असे मानले जात असले तरी मेहता समर्थकांकडून मात्र जैन ह्या १० ते १५ हजार मतं जेमतेम मिळवतील असा दावा केला जात आहे. माजी आमदार व शहरात आपलं अस्तित्व ठेवुन असलेले गिल्बर्ट मेंडोन्सा यांनी अजुनही आपली भूमिका उघड केलेली नाही. काँग्रेस आघाडी कडुन माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांना उमेदवारी जाहिर झालेली असल्याने त्यांनी आपला प्रचार सुरु केला आहे. पण मेंडोन्सा कोणाच्या बाजुने उभे राहतात यावर देखील निवडणुकीची समीकरणं फिरु शकतात. मेंडोन्सा यांनी जर जैन वा मुझफ्फर यांच्या बाजुने मैदानात उडी घेतली तर मेहतांची डोकेदुखी वाढणार हे निश्चीत आहे. त्यातही मुझफ्फर यांचे मीरारोड भागातील मतदारांशी असलेले व्यक्तीगत संबंध, उत्तन सह भाईंदरच्या एकाद भागातील काँग्रेसची ताकद पाहता एकुणच मीरा भाईंदरची लढत ही तिरंगी ठरणार असल्याचे चित्र सद्या तरी दिसत आहे. 

टॅग्स :BJPभाजपाmira-bhayandar-acमीरा भायंदर