ठाणेः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार संजय केळकर यांच्यासाठी ठाण्यात प्रचारसभा घेतली आहे. यावेळी त्यांनी अनेक विकासाच्या मुद्द्यांना हात घातला आहे. 5 वर्षांच्या मुलाला देखील विचारले तरी तो सांगेल कोण येणार आहे, राहुल गांधी बँकॉकला फिरायला गेले कारण त्यांनाही माहिती आहे कोण येणार?, असं म्हणत त्यांनी आघाडीला टोला लगावला आहे. ठाण्यातल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. शरद पवार यांच्या पक्षाची अवस्था बिकट आहे. इकडे आड तर तिकडे विहीर आहे. आघाडीला समजलं त्यांच्या किती जागा निवडून येणार आहेत, त्यामुळेच सुशील कुमार यांनी एकत्र येण्याचं सल्ला दिल्याचा टोलाही फडणवीस यांनी हाणला आहे.मेट्रोचे जाळे पसरले आहे, संपूर्ण क्षेत्र मेट्रोच्या माध्यमातून तयार केली पाहिजेत. ठाण्यात हायब्रीडच्या माध्यमातूनदेखील इंटर मेट्रो आणू, असंही त्यांनी सांगितलं आहे. प्रदूषण दूर करण्यासाठी ठाणे ते बोरिवली रोपवे आणणार आहे. कोपरी उड्डाणपूल आठ पदरी करणार आहे. वाहतूक कोंडी दूर करणार आहे. टिकुजिनी वाडी ते बोरिवली या ठिकाणच्या बोगद्याचं एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून काम सुरू आहे. अंतर्गत जल वाहतूक करण्यासाठी गडकरी यांनी मंजुरी दिली आहे, लवकरात लवकर ही सेवा सुरू होईल आणि वाहतूक कोंडी दूर होईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
आज सर्व समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपण हजारो कोटींची कामे करत आहोत, नागरिकांना दिलासा देण्याचे काम आपण करीत आहे. ज्या वेळी निधी लागला ते युतीच्या माध्यमातून देत आलो आहे. येत्या काळात ठाणेकरांसाठी क्लस्टरच्या योजना येणार आहेत. मोदीजींच्याकडून गरिबांना घरे देण्याचे काम युतीकडून होत आहे. गरिबांना एसआरएमधून 300 स्क्वेअर फूटची घरे देणार आहे. नवी मुंबई, मुंबई, ठाणे अशा कॉरिडॉरचा प्रकल्प आणत आहे. 100 टक्के डंपिंग बंद करण्यात येणार असून, प्रदूषणमुक्त आणि चांगली कामे आपण हाती घेतली आहेत. पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटींचे काम होणार आहे. गेल्या 5 वर्षात अनेक कामे केली असून, 14व्या क्रमांकावरून महाराष्ट्र 3 नंबरवर आणून ठेवला आहे. तसेच भविष्यात महाराष्ट्र एक नंबरवर येईल. उद्योगात देशात पाहिले राज्य महाराष्ट्र आले आहे. परकीय गुंतवणुकीमध्ये देखील महाराष्ट्र पहिला आहे. देशातील एकूण 25% रोजगार महाराष्ट्रात आणले. या सरकारमध्ये कधीही घोटाळे झाले नाहीत. अजून चांगले काम आपल्याला करायचे आहे. मोदींच्या कार्यक्रमाला अमेरिकेत अनेक लोक उपस्थित होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक नेते असे मोदींना संबोधले आहे. भारत हे मजबूत राष्ट्र होत असल्याचं पाकिस्तानलाही समजले आहे. भारत आणि जम्मू काश्मीर बघितले, तर पाकिस्तान रोज कारवाया करत होता आणि मोदी यांनी 370 कलम आणून जम्मू काश्मीरमुक्त केले. भारताच्या जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा झेंडा फडकवला.