ठाणे - आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला राज्यात वेग आला आहे. एक शून्य दुसऱ्या शून्याकडे गेला तरी ते शून्यच होईल असा टोला आशिष शेलार यांनी आघाडी आणि मनसेला लगावला आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण आणि ठाणे शहर या ठिकाणी उमेदवारी मागे घेत मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसने छुपा पाठिंबा दिला असून काही ठिकाणी तर मनसे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र येऊन प्रचार करताहेत, कोथरुड मतदारसंघातही मनसेच्या उमेदवाराला आघाडीने पाठिंबा दिला आहे. या प्रश्नावर आशिष शेलार यांनी हा टोला लगावला आहे. ठाण्यात एका कार्यक्रमादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते
यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, युती सरकारने 1 लाख 67 हजार शेततळी आणि विहिरी आपण या राज्यात दिले, आघाडीच्या काळातील त्यांनी त्यांची आकडेवारी त्यांनी सांगावी असं थेट आव्हान काँग्रेस-राष्ट्रवादीला केलं. मराठवाडा या भागात गेल्या अनेक वर्षे दुष्काळ पाहिला या भागात देखील भाजपकडून प्रयत्न करण्यात आले. अनेक प्रकल्प आणि बेघराना घरे दिली, ग्रामीण भागात विकास कामे केली, समृद्धी महामार्ग याचे देखील काम सुरू आहे. गतिमान वाहतुकीसाठी या सरकारने काम केले. मेट्रो हा प्रकल्प आणून शहराला वेग आणला. मेट्रो एमएमआरडीएच्या विभागात नेली, कर्ज आणि महसूल वेळेत पूर्ण केले, रोजगार कडे या सरकारने लक्ष दिले असं त्यांनी सांगितले.
मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी सर्वाना एकत्र येऊन भाजप सरकारने पाठपुरावा केला या सरकारने केला, हा पाढा वाचत शेतकऱ्यांची कर्ज माफी शरद पवार यांच्या काळात किती केली? असा प्रश्न देखील यावेळेस आशिष शेलार यांनी विचारला आहे. सहकारी बँकांना त्यांनी पैसे दिले आता हायकोर्टाने देखील स्पष्ट केले आहे. आरे बाबत न्यायालयाने निर्णय दिला आहे त्या बाबत मी काही बोलू इच्छित नाही मी उमेदवार आहे. रामजन्म भूमी युतीचा वचनामा प्रमाणे युती सरकार पूर्ण करेल हा पुर्नरुच्चार देखील आशिष शेलार यांनी केला आहे.