शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
12
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
13
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
14
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
15
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
16
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
17
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
18
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
19
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
20
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या

Maharashtra Election 2019: शिवसेना उमेदवार दीपाली सय्यदसाठी जितेंद्र आव्हाडांनी गायलं 'स्पेशल' गाणं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 3:09 PM

कळवा-मुंब्रा विधानसभा निवडणूक 2019 - गेल्या दहा वर्षात मुंब्रा परिसराचा विकास झाला नाही. लोकांना परिवर्तन पाहिजे ,आणि ज्या ठिकाणी आव्हान त्या ठिकाणी दीपाली असते अशी प्रतिक्रिया दीपाली सय्यदने व्यक्त केली.

ठाणे - विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून विविध पक्षांचे उमेदवार निवडणुकीचा अर्ज दाखल करत आहे. कळवा-मुंब्रा या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून जितेंद्र आव्हाड निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर नुकताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना कळवा-मुंब्रा मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे येथील सामना चांगलाच रंगतदार होणार असल्याचं पाहायला मिळेल. 

तसेच आज दिपाली सय्यद यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली. गेल्या दहा वर्षात मुंब्रा परिसराचा विकास झाला नाही. लोकांना परिवर्तन पाहिजे ,आणि ज्या ठिकाणी आव्हान त्या ठिकाणी दीपाली असते, अशी पहिली प्रतिक्रिया दीपाली सय्यद यांनी दिली आहे. मी चेंबूरची आहे आणि तेव्हा पासून मी शिवसेनेच्या जवळ आहे. त्यांनीच मला प्लँटफॉर्म दिला होता त्यामुळे मी अभिनेत्री झाली,मला आनंद होत आहे की मी सेनेत आहे,आणि त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असे दीपालीने सांगितले. 

दरम्यान, लोकशाहीत विरोधक अनपेक्षित नसतो, सक्षम विरोधक असायलाच हवा. दिपाली सय्यद माझी बहिण शिवसेनेकडून येतेय, तिलाही प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार आहेत. पुढील 15 दिवसांत लोकं निर्णय घेतली त्यांना जितेंद्र आव्हाड पाहिजे की दिपाली सय्यद, अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे 

इतकचं नाही तर, 15 दिवस आलेली आमची माहेरवासिण बहिण दिड लाखांच्या फारकाने तिला सासरी पाठविण्याची व्यवस्था येथील जनता करेल. यावेळी आव्हाड यांनी दीपाली सय्यद यांच्यासाठी खास गाणे  गाऊन दीपाली सय्यद यांना टोला लगावला. “बाबुल की दुआए लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले. मयके की कभी ना याद आये, ससुराल मे इतना प्यार मिले” हे गाणं गात आव्हाडांनी पंधरा दिवसांसाठी आलेली आमची माहेरवाशीण बहीण आमच्या मानवी धर्माप्रमाणे तिचं खूप औक्षण होईल, तिला खूप माया दिली जाईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.  

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडmumbra-kalwa-acमुंब्रा कळवाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस