ठाणे: विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील १८ मतदारसंघांसाठी सोमवारी मतदान पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. १८ मतदारसंघांतून २१३ उमेदवार नशीब आजमावत आहेत. २१ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होती. तेव्हापासून तिचे कडेकोट पालन प्रशासनाने केले आहे. या काळात २५ गुन्हे दाखल झाले आहेत. दोनकोटी ३६ लाखांहून अधिक रक्कम जप्त केली असून ४० लाखांहून अधिक किमतीचे मद्यही जप्त केले आहे. शिवाय, दोन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून ६८ गुंडांना तडीपार केले आहे. जिल्ह्यात ६३ लाख ९२ हजार ३५७ मतदार असून त्यासाठी २९ हजार कर्मचारी तैनात केले आहेत. ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी वाहनांची सोय केली आहे.
कडेकोट बंदोबस्त
९१०८ स्थानिक पोलीस, ३५२६ होमगाडर््स, १८ केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या, फोर्स, दौंड-धुळ्यावरून अतिरिक्त पोलीस बळ, नवी मुंबई पोलीसही मदतीला, रात्रंदिवस गस्त, आकस्मिक नाकेबंदी
जीपीएस यंत्रणा असलेल्या कंटेनरने ईव्हीएम पोहोचविणारमतदानप्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक मतदानकेंद्रातील ईव्हीएम मशीन सील करून त्या आपापल्या विधानसभानिहाय स्ट्राँग रूमवर आणल्या जातील. तिथे पुन्हा व्यवस्थित तपासणी होऊन सर्व ईव्हीएम कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत ठिकठिकाणच्या स्ट्राँग रूममध्ये पोहोचविल्या जातील.
किती उमेदवार?मतदारसंघ- उमेदवार- मतदार
भिवंडी ग्रामीण - उमेदवार- 07, मतदार- 289298
शहापूर- उमेदवार- 07, मतदार- 249278
भिवंडी पश्चिम- उमेदवार- 07, मतदार- 275843
भिवंडी पूर्व- उमेदवार- 14, मतदार- 269923
कल्याण पश्चिम- उमेदवार- 17, मतदार- 452796
मुरबाड- उमेदवार- 07, मतदार- 397869
अंबरनाथ- उमेदवार- 17, मतदार- 315482
उल्हासनगर- उमेदवार- 18, मतदार- 233222
कल्याण पूर्व- उमेदवार- 19, मतदार- 345666
मतदारसंघ उमेदवार मतदार
डोंबिवली - उमेदवार- 06, मतदार- 356018
कल्याण ग्रामीण - उमेदवार- 12, मतदार- 424913
मीरा-भाईंदर - उमेदवार- 12, मतदार- 437144
ओवळा-माजिवडा - उमेदवार- 14, मतदार- 449602
कोपरी-पाचपाखाडी- उमेदवार- 11, मतदार- 352858
ठाणे शहर- उमेदवार- 05, मतदार- 337721
मुंब्रा-कळवा- उमेदवार- 11, मतदार- 357493
ऐरोली- उमेदवार- 11, मतदार- 461349
बेलापूर- उमेदवार- 17, मतदार- 385882
मतदानासाठी ‘सुटी’ जाहीर
सर्व आस्थापना सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळात बंद ठेवण्यात येतील. त्या दिवशी बंद राहिलेली दुकाने, आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांच्या पगाराची कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही, असे सहायक कामगार आयुक्त यांनी कळविले आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनामालकांनी घेणे आवश्यक राहील.