डोंबिवलीः भगवान राम सीतामातेला अयोध्येला आणण्याइतकी 14 वर्षं वांद्रे-वरळी सी लिंकला लागली, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. काय कराल प्रगतीचं, काय कराल विकासाचं, जग कुठे गेलंय आणि अजूनही आपण कुठल्या गोष्टींवरून निवडणुका लढवतोय आणि निवडणुकीत सांगतोय चांगले रस्ते देऊ, खरंच तुमच्या आणि आमच्या मूलभूत गरजा काय असतात, 8 ते 10 गोष्टींपेक्षा जास्ती गरजा नसतात, चांगले रस्ते हवेत, चांगला वीजपुरवठा हवा, उत्तम कॉलेज, दवाखाना असावा, असं म्हणत राज ठाकरेंनी सत्ताधारी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. ते डोंबिवलीतल्या सभेत बोलत होते. कल्याण-डोंबिवली शहराला 6500 कोटी रुपये देण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्र्यांना विसर पडला आहे. सुशिक्षित डोंबिवलीची बकाल शहर ओळख झाली. मराठी उद्योजक महाराष्ट्र सोडून परदेशात जात आहेत. सत्ताधाऱ्यांना मराठी कलाकारांचा विसर पडला आहे. शेतकरी आत्महत्येसाठी जिल्ह्याची ओळख असणं लाजिरवाणी बाब आहे. सुविधांचा अभाव असून, शहराचा विकास वाऱ्यावर सोडण्यात आला आहे. फडणवीसांनी दीड लाख विहिरी कुठे बांधल्या?, असं म्हणत त्यांनी फडणवीसांवरही हल्लाबोल केला आहे.आरएसएसला मानणारा मोठा वर्ग डोंबिवलीत आहे, सत्ताधाऱ्यांनी शहरं घाण करून टाकली आहेत, मेक इन महाराष्ट्राचा भाजपाकडून बोजवारा उडाला आहे, पीएमसी बँकेचा भ्रष्ट व्यवहार आहे. या सगळ्या प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्राला खंबीर विरोधी पक्षाची गरज आहे. सरकारच्या अकार्यक्षमतेवर तुम्ही गप्प का?, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
Maharashtra election 2019 : वांद्रे-वरळी सी लिंकचा 'वनवास', 14 वर्षांचा लांबलचक काळ - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 9:31 PM