शहापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना त्यांच्यासोबत असलेले शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नसल्याची माहिती त्यांच्या मुलगा करण यांनी शनिवारी दिली. बाबांची फसवणूक झाली असून, ते शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचा दावाही करण यांनी केला.करण यांनी दिलेल्या माहितीनुसार, दौलत दरोडा यांना शुक्रवारी रात्री उशिरा विधीमंडळाचे गटनेते अजित पवार यांचा फोन आला. त्यांच्या सूचनेनुसार बाबा, मी स्वत: आणि माझा चुलत भाऊ असे सर्व जण मुंबईला रवाना झालो. तिथे पोहोचताच आम्हाला धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बोलावण्यात आले. तेथून बाबांना घेऊन गाडी सरळ राजभवनावर गेली. आम्ही पाठलाग करत, तेथे पोहोचलो. त्यावेळी मी आणि माझा चुलत भाऊ राजभवनाबाहेरच होतो. अजित पवार यांच्या शपथविधीची बातमी समजल्यावर, राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला असेल, असे सुरुवातीला वाटले. त्यानंतर बाबांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु मोबाईल बंद असल्याने, संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे पुढे काय झाले, ते माहिती नाही. मात्र एक खरे आहे की, याअगोदर आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांसोबत आणि आता मोठ्या साहेबांसोबत अर्थात राष्टÑवादीचे शरद पवार यांच्यासोबत आहोत. बाबांची फसवणूक झाल्याचा आरोप करण यांनी केला.दरोडा हरवल्याची पोलिसांत तक्रारशहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दौलत दरोडा बेपत्ता झाल्याची तक्र ार शहापूर पोलीस ठाण्यात माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शनिवारी दिली. त्यामुळे दिवसभर सुरु असलेल्या सत्तासंघर्षाला वेगळे वळण आले. आमदार दरोडा यांच्याशी संपर्क होत नसल्याचे त्यांचा मुलगा करण दरोडा यांनी पत्रकारांना सांगितल्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी दौलत दरोडा हे मतदारसंघातून बेपत्ता झाल्याची तक्र ार पोलिसांकडे दिली.
Maharashtra Government: शहापूरचे आमदार दौलत दरोडांचा कुटुंबीयांशी संपर्क नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 5:45 AM