शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी उचलली ठाण्याच्या शिवसैनिकांनी, प्रताप सरनाईकांची महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 1:30 AM

सत्तेची समीकरणे जुळत आली असताना अचानक झालेल्या नाट्यमय घडामोडीमुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांना विश्वास दाखविणे महत्वाचे होते.

ठाणे : सत्तेची समीकरणे जुळत आली असताना अचानक झालेल्या नाट्यमय घडामोडीमुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांना विश्वास दाखविणे महत्वाचे होते. यासाठी ठाण्यातील शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली होती. तर आमदार फुटू नयेत म्हणून त्यांच्या राहण्याची, हॉटेलची व्यवस्था, सुरक्षा, त्यांना कोण भेटायला येतो, कोणाला भेटू द्यायचे, कोणाला भेट देऊ नये, खाणे, पिणे या सर्वांची जबाबदारी मुंबईतील शिवसैनिकांबरोबरच ठाण्यातील शिवसैनिकांवरही होती. त्यांनी हे काम चोख बजावल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यामध्ये महत्त्वाचे योगदान शिंदे, आव्हाड यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिले असल्याचे स्पष्ट झाले आहे.मागील आठवड्यात अचानक भाजपने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना आपल्या ताफ्यात घेऊन पहाटेच सरकार स्थापन केले. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाआघाडीची गणितं फिसकटली होती. परंतु, येथेदेखील कुठेही न डगमगता, आमदारांना विश्वासात घेऊन या तीनही पक्षांनी रणनिती निश्चित केली. यामध्ये शिवसेनेवर मोठी जबाबदारी देण्यात आली होती. पळालेल्या आमदारांना शोधून आणण्यापासून त्यांची हॉटेलमधील व्यवस्था, राहणे, खाणे, पिणे आदींच्या व्यवस्था करण्याचे कामही शिवसेनेकडे सोपविण्यात आले होते.शिवसेनेने आपली ही भूमिका चोख पार पाडल्याचे दिसून आले आहे. एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावरदेखील या तीनही पक्षांची जबाबदारी होती. दुसरीकडे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावरच महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. राष्टÑवादीच्या आमदारांना एका हॉटेलमधून दुसऱ्या हॉटेलमध्ये नेणे, त्यांच्या राहण्याची, त्यांना काय हवे आहे, काय नको, या सर्वांची जबाबदार विहंग सरनाईक आणि त्यांच्या टीमवर होती. दुसरीकडे पूर्वेश सरनाईक यांच्यावर काँग्रेसच्या आमदारांची सोपविण्यात आली होती. त्यांच्याबरोबर वरुण सरदेसाई आणि युवा सेनेची कोअर कमिटी काम पाहत होती. ही मंडळी काँग्रेसच्या आमदारांना हॉटेलमधून, ने-आण करणे, राहण्याची इतर सोयीसुविधेची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर शिवसेना आणि अपक्ष आमदारांच्या वास्तव्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.१५० जणांची टीम होती तैनातविशेष म्हणजे या तीनही पक्षांच्या सुरक्षेसाठी त्यांना कोण भेटायला येतो, कोणाला भेटण्यास सोडायचे कोणाला सोडू नये यासाठी मुंबई, ठाणे आणि मीरा भार्इंदरमधील शिवसेनेची १५० जणांची टीम काम पाहत होती.एकूणच एकही आमदार फुटू नये यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रत्येक जण जबाबदारी घेत असताना इतर मंडळीवरदेखील अशा प्रकारे महत्वाच्या जबाबदाºया सोपविण्यात आल्या होत्या.जिभेचे चोचले पुरविण्यासाठी आगरी जेवणहॉटेलचे जेवण खाण्यापेक्षा शिवसेना आणि अपक्ष आमदारांसाठी रोज दुपार आणि रात्रीचे जेवण ठाण्यातूनच जात होते,अशी माहिती समोर आली आहे. यामध्ये घोडबंदर भागातील आगरी कट्टा या हॉटेलमधून रोजच्या रोज घरगुती जेवण देण्याची जबाबादरी सरनाईक यांच्यावर सोपविण्यात आली होती.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMLAआमदारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019