ठाणे : जिल्ह्यातील कल्याण लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान दि. 20 मे 2024 रोजी पार पडले. 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 50.12 टक्के मतदान झाली असल्याची माहिती 24 कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली.
24 कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 50.12 टक्के मतदान झाले असून पुरुष मतदारांचे प्रमाण 52.19 टक्के, महिला मतदारांचे प्रमाण 47.75 टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण 21.63 टक्के इतके आहे. ठाणे जिल्ह्यातील 24 कल्याण मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-
140 अंबरनाथ - एकूण मतदारांची संख्या : 3 लाख 53 हजार 554, मतदान केलेले मतदार : 1 लाख 66 हजार 407, (एकूण टक्केवारी - 47.07 %.) पुरुष मतदार संख्या : 1 लाख 89 हजार 844, मतदान केलेले पुरुष मतदार : 82 हजार 248, महिला मतदार : 1 लाख 63 हजार 654, मतदान केलेल्या महिला मतदार : 74 हजार 140, इतर मतदार : 56, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 21.
141 उल्हासनगर - एकूण मतदारांची संख्या : 2 लाख 57 हजार 367. मतदान केलेले मतदार : 1 लाख 31 हजार 505, (एकूण टक्केवारी - 51.10 %.) पुरुष मतदार संख्या : 1 लाख 39 हजार 848, मतदान केलेले पुरुष मतदार : 74 हजार 877, महिला मतदार संख्या : 1 लाख 17 हजार 422, मतदान केलेले महिला मतदार : 56 हजार 606, इतर मतदार संख्या : 97, मतदान केलेले इतर मतदार : 22.
142 कल्याण पूर्व - एकूण मतदारांची संख्या : 2 लाख 99 हजार 380, मतदान केलेले मतदार : 1 लाख 56 हजार 235 (एकूण मतदानाची टक्केवारी - 52.19 %). पुरुष मतदारांची एकूण संख्या : 1 लाख 59 हजार 289, मतदान केलेल्या पुरुष मतदारांची संख्या : 87 हजार 784, महिला मतदारांची एकूण संख्या : 1 लाख 39 हजार 684, मतदान केलेल्या महिला मतदारांची संख्या : 68 हजार 370, इतर मतदारांची एकूण संख्या : 407. मतदान केलेल्या इतर मतदारांची संख्या : 81.
143 डोंबिवली - एकूण मतदारांची संख्या : 2 लाख 75 हजार 110, मतदान केलेले मतदार : 1 लाख 42 हजार 142 (मतदानाची टक्केवारी - 51.67 %). पुरुष मतदारांची एकूण संख्या : 1 लाख 43 हजार 196, मतदान केलेले पुरुष मतदार : 78 हजार 023, महिला मतदारांची एकूण संख्या : 1 लाख 21 हजार 914, मतदान केलेल्या महिला मतदार : 64 हजार 119, इतर मतदारांची संख्या : 0, मतदान केलेल्या इतर मतदारांची संख्या : 0).144 कल्याण ग्रामीण - एकूण मतदारांची संख्या : 4 लाख 53 हजार 149, मतदान केलेल्या एकूण मतदारांची संख्या : 2 लाख 31 हजार 162 (एकूण मतदानाची टक्केवारी – 51.01 %). पुरुष मतदारांची एकूण संख्या : 2 लाख 48 हजार 124, मतदान केलेले पुरुष मतदार : 1 लाख 32 हजार 216, महिला मतदारांची एकूण संख्या : 2 लाख 04 हजार 902, मतदान केलेल्या महिला मतदार : 98 हजार 910, इतर मतदार : 123, मतदान केलेल्या इतर मतदारांची संख्या : 36.
149 मुंब्रा कळवा - एकूण मतदारांची संख्या : 4 लाख 43 हजार 661, मतदान केलेल्या एकूण मतदारांची संख्या : 2 लाख 16 हजार 159 (एकूण मतदानाची टक्केवारी - 48.72 %). पुरुष मतदारांची एकूण संख्या : 2 लाख 37 हजार 113, मतदान केलेल्या पुरुष मतदारांची संख्या : 1 लाख 18 हजार 013, महिला मतदारांची एकूण संख्या : 2 लाख 06 हजार 445, मतदान केलेल्या महिला मतदारांची संख्या : 98 हजार 136, इतर मतदारांची एकूण संख्या : 103, मतदान केलेल्या इतर मतदारांची संख्या : 10)