शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
2
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
3
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
4
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
5
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
6
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
7
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
8
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
9
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
10
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
12
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
13
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
14
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
15
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
16
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
17
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
18
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
19
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
20
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान

कपिल पाटलांकरिता केवळ ‘किसन’ आला धावून

By नितीन पंडित | Published: June 06, 2024 1:11 PM

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: अन्य आमदारांची पुरेशी साथ न मिळाल्याने पाटील यांचा पराभव 

भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना भाजपमधील त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्याच विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक साथ मिळाली.

भिवंडी (प), कल्याण (प.) शहापूर अशा भाजप, शिंदेसेना व अजित पवार गटाच्या ताब्यातील विधानसभा मतदारसंघात पाटील यांच्यापेक्षा भिवंडी मतदारसंघातील विजयी उमेदवार सुरेश म्हात्रे तथा बाळ्यामामा किंवा अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे यांना अधिक मते मिळाली. महायुतीमधील कथोरे वगळता अन्य आमदारांची पुरेशी न मिळालेली साथ व सांबरे यांनी भरभरून घेतलेली मते यामुळे पाटील यांचा पराभव झाला.

भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, भिवंडी ग्रामीण, कल्याण पश्चिम, शहापूर व मुरबाड असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. पक्षीय बलाबल पहिले तर या लोकसभा मतदारसंघात महायुतीची ताकद अधिक आहे. त्यामुळे कपिल पाटलांचा विजय निश्चित होता. मात्र पाटलांचा पराभव झाला. 

भिवंडी ग्रामीण मतदारसंघात शिंदे गटाचे शांताराम मोरे आमदार असून या ठिकाणी उद्धवसेनेमुळे बाळ्या मामा यांना फायदा झाला. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे यांना ६२ हजार ८५७ मते मिळाली. त्याचा फटका पाटलांना बसला आहे.भिवंडी पूर्व मतदारसंघात समाजवादीचे रईस शेख आमदार असून येथे मुस्लिमबहुल मतदार मोठ्या प्रमाणात असल्याने मुस्लिम समाजाने एकतर्फी बाळ्या मामा यांना मतदान केले. बाळ्या मामा यांना १ लाख ८ हजार ११३ मते मिळाली तर कपिल पाटलांना अवघी ४५ हजार ३७२ मते मिळाली.

भिवंडी पश्चिम मतदारसंघात भाजपचे महेश चौघुले हे आमदार आहेत. चौघुले यांनीदेखील कपिल पाटील यांना हवी तशी मदत केली नसल्याचे निकालावरून दिसते. या मतदारसंघात पाटील यांना अवघी ४७ हजार ८७८ मते मिळाली तर बाळ्या मामा यांना १ लाख ८ हजार ३५८ मते मिळाली. कल्याण पश्चिम मतदारसंघात पाटील यांना १ लाख ५ हजार ३६५ मते मिळाली तर अपक्ष नीलेश सांबरे यांना येथून १ लाख ९१ हजार ८७ मते मिळाली. बाळ्या मामा यांना येथून ७४ हजार १२९ मते मिळाली. शहापूर मतदारसंघात अजित पवार गटाचे दौलत दरोडा आमदार असून, येथून पाटील यांना अवघी ४३ हजार ५२१ मते मिळाली.  बाळ्या मामा यांना ५४ हजार ७०१ मते मिळाली. 

कोणत्या आमदाराच्या मतदार संघात कोणाला मिळाली किती मते

विधानसभा    आमदार        सुरेश म्हात्रे     कपिल पाटील भिवंडी पूर्व     रईस शेख (सपा)     १०८११३    ४५३७२भिवंडी पश्चिम    महेश चौघुले (भाजप)    १०८३५८     ४७८७८भिवंडी ग्रामीण    शांताराम मोरे (शिंदे गट)    ७५३३०    ८३४०२कल्याण पश्चिम     विश्वनाथ भोईर (शिंदे गट)    ७४१२९    १०५३६५शहापूर     दौलत दरोडा (अजित पवार गट)     ५४७०१    ४३५२१मुरबाड     किसन कथोरे (भाजप)     ७७५६८    १०६३६९

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलbhiwandi-pcभिवंडी