शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतील; मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांचा इशारा

By अजित मांडके | Published: November 17, 2022 8:50 PM

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना  त्यांना समजेल अशा भाषेत महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतील असा इशारा मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दिला.  

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: काँग्रेस कडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे या लोकांना चाप लावणे गरजेचे आहे. त्यासाठी उद्या संपूर्ण राज्यातून महाराष्ट्र सैनिक शेगावला पोहचतील आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना  त्यांना समजेल अशा भाषेत महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतील असा इशारा मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दिला.  

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वा . सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले . त्याचा तीव्र निषेध गुरुवारी मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आला . यावेळी मनसे चे प्रवक्ते संदीप देशपांडे , मनसे ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव , माजी नगरसेवक संतोष धुरी , ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासहमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी , महाराष्ट्र सैनिक ,अंगीकृत संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून राहुल गांधींचा निषेध करण्यात आला. 

काँग्रेसची ताकद काय आहे हे आम्ही पहिले आहे, त्यांना वलग्ना करण्याची काही गरज आहे का ? ते ३० हजार असतील तरी आम्ही ३०० पुरे आहोत. आता पपू ची पप्पूगिरी उतरवायला आम्ही एकत्र शेगावला चाललेलो आहोत आणि पपूची पप्पूगिरी आम्ही नक्की उतरवू असा विश्वास देशपांडे यांनी व्यक्त केला. राहुल गांधी जे बोलले त्याचा साधा कडक शब्दात निषेध पण शिवसेना करत नाही , ते सावरकरांच्या भारतरत्नाची मागणी करणार ? असा प्रश्न देशपांडे यांनी उपस्थित केला. अशा प्रकारे महापुरुषांचा अपमान जर होणार असेल तर त्या व्यक्तीला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नसल्याचा पुनरुचार देशपांडे यांनी केला .  

उदयानंतर राहुल गांधी कधीही महाराष्ट्रात सभा घेण्याची हिंमत करणार नाही एवढं नक्की. आम्हाला पोहचुन दिले तर आम्ही असू तिथे आणि आम्हाला पोहचून दिले नाही तर आमचे महाराष्ट्र सैनिक सक्षम आहेत त्यांना माहित आहे गनिमी कावा कसा करायचा ? या सभेत महाराजांनी केलेल्या गनिमी काव्याचा प्रत्यय सगळ्यांना दिसेल असा इशारा  मनसे ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी यावेळी दिला .

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sandeep Deshpandeसंदीप देशपांडेRahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा