शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

Vidhan Sabha 2019: युती, आघाडीवर लढतीचे गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 1:01 AM

जागावाटपाकडे लक्ष; उमेदवारीसाठी पक्षांतर्गत स्पर्धा जोरात

- प्रशांत माने कल्याण : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वपक्षीय नजरा आता युती आणि आघाडीच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. शिवसेना, भाजपची युती होईल, असा दावा केला जात असला तरी, दुसरीकडे आघाडी घोषित होऊनही काँग्रेस, राष्ट्रवादीचे जागावाटप जाहीर झालेले नाही. स्वबळावर लढण्याचा सूर सेना, भाजपमध्ये स्थानिक पातळीवर असताना, जागावाटपात कुणाच्या वाट्याला कोणता मतदारसंघ येतो, याकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील इच्छुकांचे लक्ष लागले आहे. तूर्तास, उमेदवारी मिळण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची स्पर्धा तीव्र आहे. या सर्व घडामोडी पाहता युती आणि आघाडीच्या जागावाटपाबाबत पक्षनेतृत्व काय निर्णय घेतात, यावरच कल्याण, डोंबिवली परिसरातील चारही मतदारसंघांच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार, उमेदवारी अर्ज दाखल करणे, छाननी आणि अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आटोपल्यानंतर उमेदवारांना प्रचारासाठी केवळ १२ दिवस मिळणार आहेत. तूर्तास युती आणि आघाडीचे दावे दोन्हीकडच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सुरू आहेत. परंतु, युतीची घोषणा जागावाटपासाठी अडली असून, आघाडीची घोषणा झाली, तरी जागांचे वाटप अद्याप झालेले नाही. विशेष बाब म्हणजे, युती आणि आघाडीचे दावे केले जात असले तरी, सर्व पक्षांनी सर्वच मतदारसंघांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन ठेवल्या आहेत, हेदेखील विसरून चालणार नाही.२००९ च्या निवडणुकीत युती आणि आघाडी झाली होती. परंतु, कल्याण पश्चिम मतदारसंघात पक्षांतर्गत स्पर्धा आणि मित्रपक्षातील पदाधिकाऱ्याने केलेली बंडखोरी शिवसेनेला विजय संपादन करण्यात आडकाठी ठरली होती. यंदाही या मतदारसंघात उमेदवारीसाठी पक्षांतर्गत स्पर्धा जोमात असून शिवसेनेच्या तब्बल ११ जणांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या आहेत. युती झाल्यास हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात यावा, अशीही मागणी आता होत असल्याने २००९ मधील लढतीचे चित्र पुन्हा दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कल्याण पूर्व आणि कल्याण ग्रामीणमध्येही उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांतर्गत स्पर्धा पाहायला मिळत असून, काहींनी तर उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच ग्रामीण मतदारसंघात कार्यालये उघडून प्रचाराला सुरुवातही केली आहे. कल्याण पूर्वेतील उमेदवार स्थानिक असावा, अशीही मागणी नेतृत्वाक डे लावून धरण्यात आली आहे. शिवसेनेप्रमाणे भाजपमध्येही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. चार मतदारसंघांसाठी २२ जणांनी मुलाखती दिल्या आहेत.राष्ट्रवादीचा दोन जागांवर दावा, काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्षआघाडीचा आढावा घेता, २००९ साली आघाडीमध्ये चारही मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेले होते. २०१४ मध्ये आघाडी न होता काँग्रेस, राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढले होते. दरम्यान, आता चारपैकी दोन जागा मिळाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीकडून केली गेली आहे. त्याला काँग्रेसकडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडेही लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडीतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या असून, त्यांची पहिली यादी २० सप्टेंबरला घोषित होईल, असे सांगितले जात होते.परंतु, एमआयएमशी युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे यादी तूर्तास लांबणीवर पडल्याची सूत्रांची माहिती आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून निवडणूक लढवण्याचे संकेत मिळाल्याने स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे. परंतु, युती आणि आघाडीच्या समीकरणाकडे मनसेसह वंचित बहुजन आघाडीचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस