Vidhan Sabha 2019: ठाणे मतदारसंघावरून आघाडीत बिब्बा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:18 AM2019-09-27T00:18:16+5:302019-09-27T00:18:32+5:30

काँग्रेस नडली; राष्ट्रवादी अडली

Maharashtra Vidhan Sabha 2019 Bibba leads from Thane constituency | Vidhan Sabha 2019: ठाणे मतदारसंघावरून आघाडीत बिब्बा

Vidhan Sabha 2019: ठाणे मतदारसंघावरून आघाडीत बिब्बा

Next

ठाणे : एकीकडे राज्यात शिवसेना आणि भाजपची युती होण्याआधीच काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाली आहे. परंतु, असे असतानाही ठाण्यात मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये ठाणे शहर विधानसभा मतदारसंघावरून कलगीतुरा रंगला आहे. काँग्रेसने या जागेवर दावा करून ती जागा मिळावी म्हणून श्रेष्ठींना साकडे घातले आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीत मीरा-भाईंदरच्या बदल्यात ठाणे असे समीकरण ठरले असल्याने कोणत्याही परिस्थितीत ठाणे विधानसभा क्षेत्र सोडणार नसल्याचा दावा राष्ट्रवादीने केला. त्यामुळे हा मतदारसंघ कोणाच्या पदरात पडणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार असले, तरी यानिमित्ताने या दोन्ही पक्षांत तूर्तास ठिणगी पडली आहे.

राज्यात आघाडीकडून वेगवान घडामोडी घडत आहेत. मात्र, ठाण्यात मात्र काँग्रेस आणि राष्टÑवादीमध्ये एका मतदारसंघावरून आघाडीत बिब्बा पडला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्टÑवादीमध्ये एक समझोता झाला होता. त्यानुसार, मीरा-भार्इंदर हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा निर्धार केला होता. त्या बदल्यात ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात राष्टÑवादी लढणार हे निश्चित झाले होते.

आता ऐन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ठाणे शहर विधानसभा क्षेत्रावर दावा केला आहे. पूर्वीपासून हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता, त्यामुळे तो मिळावा यासाठी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यानुसार, श्रेष्ठींकडेही त्यांनी तशी मागणी केली आहे.
मागील विधानसभा निवडणुकीचा विचार केला, तर या मतदारसंघातून काँग्रेस आणि राष्टÑवादी हे वेगळे लढले होते. त्यानुसार, काँग्रेसला या मतदारसंघातून १५ हजारांच्या आसपास तर राष्टÑवादीला २४ हजारांच्या आसपास मते मिळाली होती. परंतु, त्यानंतर झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत काँग्रेसला या मतदारसंघातून भोपळासुद्धा फोडता आलेला नाही. तर, राष्टÑवादीचे येथे चार नगरसेवक निवडून आले. यामुळेच आता राष्टÑवादीने आपला दावा आणखी मजबूत केला आहे.

ठाणे शहर मतदारसंघ मिळावा, ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. मात्र, लोकसभेत ठरले असल्याने कोणत्याही परिस्थितीत ठाणे शहर विधानसभा सोडणार नाही.
- आनंद परांजपे, ठाणे शहराध्यक्ष, राष्टÑवादी

हा मतदारसंघ राष्टÑवादीला हवा असल्याची मध्यंतरी चर्चा होती. त्या अनुषंगाने ही मागणी करण्यात आली असावी. मात्र, या मतदारसंघाबाबत अद्यापही दोन्ही पक्षांकडून कोणत्याही प्रकारची चर्चा सुरू झालेली नाही. चर्चा झाल्यानंतरच हा मतदारसंघ कोणाला मिळणार, हे निश्चित होणार आहे.
- मनोज शिंदे,
ठाणे शहराध्यक्ष, काँग्रेस

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 Bibba leads from Thane constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.