कल्याण : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आमदार सुभाष भोईर यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भोईर यांनी मंगळवारी सकाळी अर्ज दाखल केला आहे. तर, एबी फॉर्म मिळाल्याचा सोशल मीडियावरील मेसेज चुकीचा असल्याचे रमेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले.शिवसेनेतर्फे ‘मातोश्री’वर सोमवारी उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. कल्याण ग्रामीणमधून शिवसेनेतर्फे रमेश म्हात्रे, कैलास शिंदे, एकनाथ पाटील, भरत भोईर, राजेश मोरे, दीपेश म्हात्रे हे इच्छुक होते. भोईर यांना उमेदवारी निश्चित झाल्याने इच्छुक नाराज गटाला पक्षश्रेष्ठींनी मातोश्रीवर बोलावून त्यांची समजूत काढण्यात आली. यावेळी त्यांना काय आश्वासन मिळाले हे कळू शकले नाही. इच्छुकांपैकी रमेश म्हात्रे यांनाही पक्षाने एबी फॉर्म दिल्याचा मेसज सोशल मीडियावर सकाळपासून फिरत होता. मात्र भाईर यांनी सकाळी ११ वाजताच अर्ज भरल्याने संभ्रम निर्माण झाला होता. यासंदर्भात रमेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मला एबी फॉर्म दिल्याचा सोशल मीडियावरील मेसेज चुकीचा आहे. पक्षाकडून इच्छुकांसोबत चर्चा सुरू आहे.
Vidhan sabha 2019 : सुभाष भोईर यांचा कल्याण ग्रामीणमध्ये अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 1:31 AM