शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

वर्षातील अखेरच्या अंगारकीला टिटवाळ्यात भाविकांचा महापूर

By admin | Published: September 02, 2015 3:42 AM

या वर्षातील शेवटची अंगारकी चतुर्थी असल्याने टिटवाळ्याच्या गणेश मंदिरात बापाच्या दर्शनासाठी सोमवारी रात्री पासूनच भाविकांचा महापूर उसळला होता

टिटवाळा : या वर्षातील शेवटची अंगारकी चतुर्थी असल्याने टिटवाळ्याच्या गणेश मंदिरात बापाच्या दर्शनासाठी सोमवारी रात्री पासूनच भाविकांचा महापूर उसळला होता. त्याना योग्य सेवा मिळून दर्शनाचा लाभ घेता यावा या करिता मंदिर विश्वस्तांकडून उत्तम व्यवस्था तर टिटवाळा पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवला होता.रात्री बारा वाजता मंदिर विश्वस्त विनोद जोशी व सुभाष जोशी यांनी श्री ना अभिषेक केला. आरती करून मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले केले. तेंव्हापासून भाविकांची झुंबड उडाली होती. गणपती बाप्पा मोरया, उंदीर मामा की जय. या घोषाणांनी संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून निघाला होता होता. यावेळी परिसरातून मोठ्या प्रमाणात पायी दिंड्या देखील गणेशाच्या दर्शनासाठी टिटवाळ्यात दाखल झाल्या होत्या. तसेच उल्हासनगर(कालीबाडी,कुर्ला कॅम्प ) ते टिटवाळा महागणपती पदयात्रा दृष्टी सामाजिक संघटना आणि श्री सार्इं सेवक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली होती. सुमारे ८ किलोमीटरचे आंतर पायी चालत सुमारे २५० भाविक दाखल झाले होते. मुंबई, ठाणे सह लगतच्या कल्याण,डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी, शहापूर, मुरबाड, वासिंद या उपनगरातील भाविकांनी या ठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. स्थानिक नगरसेविका उपेक्षा भोईर यांनी भाविकांसाठी मोफत खिचडी वाटप केली. यावेळी मंदिर व्यवस्थापनानेसुरक्षा यंत्रणा सज्ज केली होती. तसेच अनिरुद्ध बापू यांचे स्वयंसेवक सेवकदेखील आपल्या परीने सेवा करत होते. टिटवाळा पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला होता. तीन उपविभागीय अधिकारी, एक पोलीस निरीक्षक, दोन सह. पो. नि. चार पो.उ.नि, वाहतूक शाखेचे २५ कर्मचारी, २० महिला कर्मचारी व इतर दिडशे कर्मचारी वर्गाचा बंदोबस्त ठेवला असल्याचे टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांनी सांगितले. (वार्ताहर)