नारायण जाधव
निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल शनिवारी वाजले आहे. राज्याच्या सत्तासोपानावर आरूढ होण्यासाठी तब्बल १८ जागा असलेल्या ठाणे जिल्ह्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवाय, राज्यातील सर्वाधिक औद्योगिकीकरण आणि नागरिकीकरणामुळे मुंबईनंतर सर्वाधिक सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून राज्यकर्त्यांचे ठाणे जिल्ह्याकडे लक्ष असते. गेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील १८ पैकी १४ मतदारसंघांवर शिवसेना-भाजपने युती नसतानाही एका पुरस्कृत अपक्षासह आपला भगवा झेंडा फडकवला होता. राष्ट्रवादीला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यातील पांडुरंग बरोरा शिवसेनेत, तर ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी भाजपत प्रवेश केला आहे. देशातील सर्वात मोठा आणि जुना पक्ष असलेल्या काँगे्रसला भोपळाही फोडता आला नव्हता. या खेपेला युती होवो अथवा न होवो, जिल्ह्यात शिवसेना-भाजपचे वर्चस्व सध्या तरी दिसत आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईक यांनी पुत्र संजीव व संदीप नाईकांसह भाजपत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीचे उरलेसुरले अवसान गळाले असून त्यांची सारी मदार मुंब्य्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरच राहणार आहे. काँगे्रसची जिंकणे तर सोडाच, परंतु सध्या उमेदवार शोधतानाही दमछाक होताना दिसत आहे.ठाणे : गेल्या विधानसभेत स्वतंत्र लढलेल्या भाजपने मोदीलाटेत शिवसेना आणि राष्ट्रवादीला धक्का देऊन जिल्ह्यात एका पुरस्कृत अपक्ष आमदारासह आठ जागांवर मुसंडी मारली होती. ठाणे शहर, कल्याण पश्चिमेत भाजपने शिवसेनेला जोरदार टक्कर दिली, तर बेलापूरमध्येजिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या गणेश नाईकांसारख्या राष्ट्रवादीच्या तगड्या नेत्याचा पराभव करून मंदा म्हात्रे यांच्या रुपाने नवी मुंबईसारख्या शहरात शिरकाव केला होता. या निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला सहा, तर राष्ट्रवादीच्या वाट्याला अवघ्या चार जागा आल्या होत्या. काँगे्रसला भिवंडीसह कोठेच भोळा फोडता आला नव्हता.
गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात युती आणखी भक्कम झाली आहे. शिवसेना नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले संघटनकौशल्य दाखवून ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर महापालिकेत भाजपला हाताशी धरून, तर भिवंडीसारख्या मुस्लिमबहुल लोकवस्तीच्या शहरात काँगे्रससोबत हातमिळवणी करून महापालिकेतील सत्तेत वाटा मिळवला आहे. शिवाय, लोकसभा निवडणुकीत ठाणे आणि कल्याण मतदारसंघांत पक्षाचे खासदार निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ठाणे शहर आणि कल्याण-डोंबिवलीत मित्रपक्ष भाजपला त्यांची जागा दाखवून देण्याचे कसब दाखवले आहे.
आता ठाणे शहर मतदारसंघावरही शिवसेनेने दावा करून भाजपचे आ. संजय केळकर यांची डोकेदुखी वाढविली आहे. येथून शिवसेनेकडून महापालिकेतील सभागृह नेते नरेश म्हस्के इच्छुक आहेत. एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात आपले एकहाती वर्चस्व कायम ठेवले आहे. काँगे्रसचे ठाणे शहर अध्यक्ष असलेल्या मनोज शिंदे यांच्यासारख्या नेत्याला शिवसेनेच्या मदतीने महापालिकेच्या स्थायी समितीत वाटा देऊन विरोधक शिल्लकच ठेवलेला नाही. ओवळा-माजिवडा या मतदारसंघात शिवसेनेचे प्रताप सरनाईक हे आमदार असून या खेपेला त्यांच्या मतदारसंघातून महापौर मीनाक्षी शिंदे, दिलीपबारटक्के, नरेश मणेरा यांनी उमेदवारी मागितली आहे. या मतदारसंघाचाच भाग असलेल्या मीरा-भार्इंदरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून सरनाईक यांना भाजपशी पंगा घ्यावा लागला आहे.
भार्इंदर मतदारसंघ सध्या भाजपच्या वाट्याला असून येथे नरेंद्र मेहता हे आमदार आहेत. येथील महापालिकेत भाजपचे एकहाती वर्चस्व असून गुजराथी आणि हिंदी भाषिक मतदारांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत मेहता अनेक प्रकरणांत वादग्रस्त ठरले असून शिवसेनेशीही त्यांनी अनेकदा पंगा घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच त्यांची पाठराखण केली आहे. येथूनकाँगे्रसचे प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन इच्छुक आहेत.
कळवा-मुंब्रा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचेच वर्चस्व असून लोकसभा निवडणुकीतही येथून पक्षाला बहुमत प्राप्त झाले होते. त्यांच्यासमोर शिवसेनेचे आव्हान राहणार असून एमआयएमकडून अरबाज खान यांचे नाव चर्चेत आहे.नवी मुंबईसारख्या सर्वाधिक कॉस्मोपोलिटन लोकवस्तीच्या शहरात अनेक वर्षे सत्तेवर असलेल्या गणेश नाईकांना बेलापूर मतदारसंघातून मोदीलाटेमुळे मंदा म्हात्रेंकडून पराभव पत्करावा लागला होता. ऐरोलीत त्यांचे पुत्र संदीप नाईक हे निवडून आले होते. मात्र, यानंतर मोदीलाटेतही त्यांनी महापालिकेवरील आपली सत्ता कायम ठेवली. लोकसभा निवडणुकीत नवी मुंबई शहरात राष्ट्रवादी ७० हजारांहून जास्त पिछाडीवर पडल्याने काळाची पावले ओळखून नाईकांनी आपल्या सर्व समर्थक नगरसेवकांसह भाजपत प्रवेश केला. ऐरोली मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला असून बेलापूरमधून मंदा म्हात्रे या आमदार आहेत. म्हात्रेंनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या अनेक विकासकामांमुळे त्यांचा या मतदारसंघावरील दावा कायम आहे. तिकडे शिवसेनेकडून निवृत्त सनदी अधिकारी विजय नाहटायांनी शिवसेनेच्या बॅनरऐवजी आपल्या नाहटा फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांचा सपाटा लावला आहे. गल्लीबोळांतील कार्यकर्त्यांनाही विभागप्रमुखांपासून शाखाप्रमुखांपर्यंतच्या पदांची खिरापत वाटून आपले आव्हान कायम ठेवले आहे. त्यांना स्वपक्षाच्या नामदेव भगत यांची डोकेदुखी राहणार आहे. मात्र, नाईकांच्या भाजपप्रवेशामुळे आता शहरातील सारीच समीकरणे बदलली असून युतीच्या जागावाटपात हे दोन्ही मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाऊ शकतात. काँग्रेस-राष्ट्रवादीला येथे उमेदवार शोधताना नाकीनऊ आले आहे. राष्ट्रवादीकडून दिवा-ऐरोलीच्या एका कोपऱ्यापुरते मर्यादित असलेल्या चंदू पाटील यांनी ऐरोलीतून, तर बेलापूरमधून अनिल कौशिक, संतोष शेट्टी दावेदार आहेत. त्यांची सर्वांचीच मदार माथाडी मतांवर आहे.
डोंबिवली मतदारसंघावर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा दावा आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत शिवसेनेची दादागिरी मोडून काढण्यात त्यांना म्हणावे तसे यश आलेले दिसत नाही. कल्याण पूर्वेत अपक्ष आ. गणपत गायकवाड यांनी यावेळी रीतसर भाजपत प्रवेश करून ते हॅट्ट्रिकच्या तयारीत आहेत.
गायकवाड यांच्याविरोधात शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी २०१४ साली निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा निसटता पराभव झाला होता. आता पुन्हा लांडगे यांनी मुलाखत दिली आहे.कल्याण पश्चिम मतदारसंघात भाजपचे नरेंद्र पवार हे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघावर दावा करून अनेक शिवसैनिकांनी उमेदवारी मागितली आहे.कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचे सुभाष भोईर हे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघातून रमेश म्हात्रे यांच्यासह डोंबिवली प्रमुख राजेश मोरे, ठाण्याचे उपमहापौर रमाकांत मढवी यांनीही दावा सांगितला आहे. पालकमंत्र्यांची त्यांच्यावर खप्पामर्जी आहे. राष्ट्रवादीकडून बाबाजी पाटील इच्छुक आहेत.उल्हासनगरात राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार ज्योती कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांनी महापालिकेतीलसत्तेसाठी भाजपशी हातमिळवणी केली आहे. कुमार आयलानींसारख्या भाजपच्या जुन्या नेत्याने ज्योती यांना आव्हान दिले आहे.अंबरनाथ मतदारसंघात शिवसेनेचे डॉ. बालाजी किणीकर हे आमदार आहेत. मात्र, भाजपने या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. तिकडे मुरबाडमध्ये किसन कथोरे हेच भाजपकडून दावेदार असून शिवसेनेने त्यांचे कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेतील उपाध्यक्ष सुभाष पवार यांना पक्षात आणून कथोरेंवरील दबाव वाढवला आहे. राष्ट्रवादीकडून येथून प्रमोद हिंदुराव उमेदवार राहू शकतात.शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवबंधन हातात बांधून पक्षाला मोठा धक्का दिला आहे. भिवंडी शहर काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असला, तरी गेल्या वेळी येथे सर्व युतीचे आमदार निवडून आले. मात्र, नंतर महापालिकेत काँग्रेसची सत्ता आली. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ४४ नगरसेवकांनी स्वपक्षाच्या उमेदवारापुढे बंडाचा झेंडा फडकावला होता. यामुळे काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम मतदारसंघांत शिवसेना-भाजपला पुन्हा बहुमत मिळाले. परंतु, भिवंडी ग्रामीणमध्ये मात्र विद्यमान आमदार शांताराम मोरे यांच्यासाठी धोक्याची घंटा खणखणते आहे. लोकसभा निवडणुकीत येथून काँगे्रस उमेदवार सुरेश टावरे यांना मताधिक्य मिळाले आहे.
आजी-माजी पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणालाठाणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह माजी पालकमंत्री आणि नुकतेच भाजपत प्रवेश केलेले गणेश नाईक यांंची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. सध्या भाजपचेच आमदार जास्त असले, तरी गणेश नाईकांसमोर आहे ती संख्या टिकवून पक्षाचे आणखी आमदार वाढविण्याचे आव्हान आहे. एकनाथ शिंदे यांच्याही समोर जिल्ह्यातील शिवसेनेचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी पक्षाच्या आमदारांची संख्या वाढविण्याचे मोठे आव्हान आहे. गणेश नाईकांच्या मदतीला डोंबिवलीचे आमदार आणि रायगड व पालघरचे पालकमंत्री असलेले रवींद्र चव्हाण हे आहेत. तसेच जिल्हा परिषदेसह ठाणे, कल्याण-डोंबिवली या महापालिका आणि अंबरनाथ-बदलापूर नगरपालिकेतील भाजपची सत्ता शिंदेंच्या दिमतीला आहे.निसटते पराभवगेल्या निवडणुकीत कल्याण पूर्व मतदारसंघातून शिवसेनेच्या गोपाळ लांडगे यांचा भाजप पुरस्कृत अपक्ष गणपत गायकवाड यांच्याकडून ७४५ मतांनी, तर बेलापूर मतदारसंघातून गणेश नाईक यांंचा भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याकडून दीड हजार मतांनी पराभव झाला होता.सध्याचे पक्षीय बलाबलएकूण जागा १८भाजप- ७शिवसेना- ६राष्ट्रवादी- ४अपक्ष- १वंचितचा बार ठरणार फुसकालोकसभा निवडणुकीत राज्यात काही मतदारसंघांत निर्णायक मते घेणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे अस्तित्व जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत तोळामासा आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय तर ते अतिशय कुचकामी ठरतील, असे दिसते.मनसेची भूमिका गुलदस्त्यातराज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह नवी मुंबई शहरात बºयापैकी मते आहेत. कल्याण-डोंबिवलीत गेल्या खेपेला त्यांचे नगरसेवक निवडून आले होते. परंतु, शिवसेना-भाजपने मिळून मनसेला कात्रजचा घाट दाखविला आहे. गेल्या लोकसभेला मनसेला ५० हजारांच्या आसपास मते मिळाली होती. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीतील मराठी मतांवर मनसेची मदार आहे. काही पट्ट्यात ती निर्णायक ठरू शकतात. शिवाय, पक्षाचे उपद्रवमूल्य सर्वच शहरांत आहे. या खेपेला मनसे १०० जागा लढणार, असे सांगितले जात असले तरी त्यातील ठाणे जिल्ह्यातील किती व कोणत्या जागा असतील, हे मात्र गुलदस्त्यातच आहे.हॅट्ट्रिकची संधीसंदीप नाईक- ऐरोलीनरेंद्र मेहता- भार्इंदरजितेंद्र आव्हाड- मुंब्राडोंबिवली- रवींद्र चव्हाणप्रताप सरनाईक- ओवळा-माजिवडागणपत गायकवाड- कल्याण पूर्व............................वाचली