ठाणे :भाजप आमदार गणपत गायकवाड गोळी बार प्रकरणात जखमी झालेले शिवसेनेचे कल्याण विभाग शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि त्याचे सहकारी राहुल पाटील यांना लवकरच ज्युपिटर रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
उल्हासनगर हिल लाईन पोलिस ठाण्यात गणपत गायकवाड यांनी शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी महेश गायकवाड आणि सहकारी राहुल पाटील यांच्यावर जमिनीच्या वादावरून एकूण १० गोळ्या झाडल्या होत्या ,त्यापैकी महेश गायकवाड यांच्यावर ६ गोळ्या तर राहुल पाटील यांच्यावर २ गोळ्या झाडल्या होत्या. त्यामुळे दोघाना तातडीने उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात हलविण्यात आले होते. महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,खासदार श्रीकांत शिंदे सह इतर नेते मंडळी यांनी देखील उपचारा दरम्यान भेटून गेले होते. त्यानंतर या दोघांना लवकरच घरी सोडले जाणार आहे.
महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना ज्युपिटर रुग्णालयातुन डिस्चार्ज दिल्यानंतर दोघाच्या समनार्थ मोठ्या संख्येने ठाणे आणि कल्याण डोंबिवली या ठिकाणाहून शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कायदा सुव्यवस्था बघता मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त देखील ठेवला जाणार आहे. दोघाना त्यांचे चाहते आणि शिवसैनिक भेटण्यासाठी जागोजागी एकच गर्दी करणार आहेत. या गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड सह ५ जणांना १४ दिवसाची न्यायालईन कोठडी उल्हासनगर चोपडा कोर्टाकडून देण्यात आलेली आहे सध्या सर्व आरोपीना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तळोजा कारागृहात हलविण्यात आले आहे. या प्रकरणामुळे येणाऱ्या काळात कल्याण -डोंबिवली मतदार संघात शिवसेना आणि भाजप असा आमना सामना पाहायला मिळणार आहे.