शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

महेश पाटील यांच्यावर ‘मोक्का’ची कारवाई?, मंत्र्याचा दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 3:10 AM

ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भाजपाचे सहयोगी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची ५० लाखांची सुपारी दिल्याप्रकरणी भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांना वाचविण्यासाठी भाजपाचा एक मंत्री दबावतंत्राचा वापर करीत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली.

ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भाजपाचे सहयोगी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची ५० लाखांची सुपारी दिल्याप्रकरणी भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांना वाचविण्यासाठी भाजपाचा एक मंत्री दबावतंत्राचा वापर करीत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली. या प्रकरणातील आरोपींवर ‘मोक्का’खाली कारवाईची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.दरम्यान हे प्रकरण ग्रामीण पोलिसांकडून ठाणे शहर खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग झाल्यानंतर, याप्रकरणी अटकेतील आरोपींचा ताबा मिळावा, यासाठी ठाणे पोलिसांनी न्यायालयाला विनंती केली आहे. तर,नगरसेवक महेश पाटील यांच्याविरोधात मागील २० वर्षात एकूण १५ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.भिवंडीनजिक कुडूस येथे एका दरोड्याचा तपास ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत होते.त्यांनी १३ डिसेंबरला भिवंडीतून कैलास घोडविंदे,राजू शेट्टी,अलुद्दीन शेख,विजय मेनबन्सी आणि सुजित नलावडे आदी सहा दरोडेखोरांना अटक केली.त्यांच्यापैकी विजय याने कुणाल यांच्या हत्येची सुपारी नगरसेवक महेश पाटील यांनी दिल्याचे उघड केले. पाटील यांच्याविरु द्ध गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या हत्येचा कट डोंबिवलीतच शिजला,तसेच त्यासाठी मारेकरी डोंबिवली परिसरात जमा झाले होते,असा तपशील आणि पुरावे हाती आल्याने ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश पाटील यांच्या आदेशानुसार हे संपूर्ण प्रकरण मानपाडा पोलिसांकडे वर्ग केले. त्यानंतर हे प्रकरण तातडीने ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग झाले आहे. पाटील यांना वाचवण्यासाठी दबावतंत्र वापरले जात आहे.>गुन्ह्यांची जंत्रीनगरसेवक महेश पाटील यांच्याविरोधात मागील २० वर्षात तब्बल १५ गुन्हे दाखल आहे. यामध्ये सर्वाधिक ६ गुन्हे मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल आहेत.त्यापाठोपाठ डोंबिवली-५, टिळकनगर, शिळा-डायघर, महात्मा फुले आणि लोणावळा या पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक-एक गुन्हा दाखल आहे. तसेच मानपाड्यात हत्येचे दोन तर डोंबिवलीत एक गुन्हा दाखल आहे. तर अपहरणप्रकरणी लोणावळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याचबरोबर खुनाचा प्रयत्न यासारखा व अन्य गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.