ठाणे : ठाण्यात पकडलेल्या हेरॉइनप्रकरणी गुन्हे शाखेच्या ठाणे अमलीविरोधी पथकाने मध्य प्रदेशातून मुख्य आरोपी अब्दुल इस्माईल खान (वय 69) याला शुक्रवारी रात्री अटक केली. शनिवारी न्यायालयाने त्याला 18 ऑक्टोबर्पयत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाणे रेल्वे स्थानकाजवळ हेरॉइनविक्रीसाठी आलेल्या मुंब्य्रातील सोनू शाग्गीर अहमद अन्सारी (26) याला ठाणो अमली पदार्थविरोधी पथकाने बुधवारी अटक केली होती. या वेळी त्याच्याकडून 39 लाख 25 हजारांचे 392.5 ग्रॅम इतके हेरॉइन हस्तगत केले होते. त्याने तो माल अटकेच्या दोन दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात जाऊन आणला होता. त्या प्रवासादरम्यान रेल्वेचे तिकीट पोलिसांच्या हाती लागले. सोनू हा नशेच्या आहारी गेला आहे. दरम्यान, चौकशीत त्याने मध्य प्रदेशातील सीतामाऊ येथे अब्दुल खान (69) यांच्याकडून हा माल विकत घेतल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार, मध्य प्रदेशला रवाना झालेल्या पथकाने खान याला अटक के ली. शनिवारी त्याला ठाणे न्यायालयात हजर केल्यावर त्याला 18 ऑक्टोबर्पयत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे यांनी दिली.
खान याला यापूर्वी मध्य प्रदेश पोलिसांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यात अटक केली होती. तसेच 8 वर्षे कारावासाची शिक्षा भोगून आला असून तो हेरॉइन तयार करत असल्याचा संशय ठाणे पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच सोनू अन्सारी याला हा माल आणण्यासाठी कोणीतरी पाठवले असण्याची शक्यता असून त्या दृष्टीनेही तपास सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिका:याने दिली.