डोंबिवली: ठाणे ते कल्याण मुख्य मार्गावर रविवारी अप व डाऊन जलद मार्गावरील आणि वाशी ते पनवेल अप व डाउन हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक दरम्यान देखभाल कार्य केली. त्यात ठाणे ते कल्याण दरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर २६० मीटर पॅनेल व १४ पॅनेल, ११ डीएसएस स्लीपर, १९ क्रॉसिंग स्लीपर व १३ मीटर रूळांचे नूतनीकरण करण्यात आले. ६५ स्लीपर्सच्या शॅलो स्क्रीनींगचे काम, एक पूर्ण सेट कालबाह्य एसईजेची जागा बदलणे आणि ग्लूड जोडांचे बदल देखील करण्यात आली. विभागातील काही ठिकाणी ४५ स्क्रॅप रूळांचे गॅस कटींग व वेल्डिंगचे कामही करण्यात आले. पारसिक बोगदा विभागात ६६ रूळांचे लोडिंग करण्यात आले. विभागात ड्रेन साफसफाईचे कामही करण्यात आले.
तसेच ठाणे-कल्याण विभागात जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावरील वाशी-पनवेल विभागात ओएचईची वार्षिक तपासणी केली गेली. ४ इन्सुलेटर, २१ जीर्ण/निष्कामी ड्रॉपर्स बदलण्यात आले, २ इंसुलेटर्सची प्लंब शिफ्टिंग आणि कटिंग करण्यात आली. डिस्कनेक्शन / रिकनेक्शन आणि ४० बाँडिंगच्या तरतुदी व्यतिरिक्त संपर्क तारांचे धारण करण्याचे काम, मास्ट चे काढून टाकणे, सी-जंपर्सची तपासणी आणि बोगद्याखाली ओएचई च्या मंजुरीची तपासणी देखील करण्यात आली. आवश्यकतेनुसार वृक्षतोडणी व छाटण्याचे कामही हाती घेण्यात आले. ही कामे क्रेन स्पेशल, ४ टॉवर वॅगन्स आणि ५ शिडी गॅगसह केली गेली.
सिग्नल व दूरसंचार कामे एक पूर्ण सिग्नल युनिट, फ्रीक्शन क्लचेस, तांबे ट्रॅकच्या शिशाच्या तारा, नट-बोल्ट, ब्रॅकेट्स बदलण्यात आले आणि संपूर्ण ग्राउंड कनेक्शन सेट्स करण्यात आले. लीड वायर्स व डीएसी सेन्सरचे डिसकनेक्शन व पुन्हा जोडण्याचे काम तसेच ग्राउंड कनेक्शनचे कामही केले गेले. याव्यतिरिक्त, दिवा आणि कोपर दरम्यान १.२५ कि.मी. रूळांच्या नूतनीकरणासाठी इंजिनियरिंगशी समन्वय साधण्यात आला, ट्रॅक कनेक्शनची अखंडता तपासणे आणि डाऊन जलद मार्गाचे ट्रॅक पॅरामीटर्स मोजणे देखील सिग्नल व दूरसंचार वॉरियर्सनी केल्याचे जनसंपर्क अधिकारी डॉ. ए के सिंग यांनी सांगितले.