- शाम धुमाळ
कसारा- ठाण्यात समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी पहाटे मोठी दुर्घटना घडली. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असतांना गर्डर मशिन आणि क्रेन खाली कोसळल्याने 20 मजूर ठार झाले आहेत. तर 3 गंभीर जखमी आहेत. क्रेन आणि स्लॅब खाली अनेक जण दबले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, तातडीने मदतीसाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या आणि डॉग स्कॉड देखील घटनास्थळी पोहचले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
समृद्धी महामार्गाच्याठाणे ते शिर्डी या तिसऱ्या टप्प्याचे काम सध्या सुरु आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास देखील समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते. त्यावेळी शाहपूर सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असतांना गर्डर आणि क्रेन अचानक कोसळली. गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन खाली असलेल्या मजूरांवर कोसळली. यात 20 मजूरांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत. 20 मृतदेह हे शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तर तीन जण जखमी मजुरांवर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.तर 2 जखमी वर ज्युपिटर हास्पिटलला हलविण्यात आले असून एक जन शहापूर उपजिल्हा हॉस्पिटल ला उपचार घेत आहेत.
बळींची संख्या वाढण्याची भीती
घटनेची माहिती मिळताच सकाळी 7 वाजता एनडीआरएफचे दोन पथके घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्या सोबत डॉग स्कॉड देखील असून ढीगाऱ्या खाली दबले असणाऱ्यांचा शोध सुरू आहे. आतापर्यंत 20 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ३ जखमी झाले आहेत. आणखी सहा जण कोसळलेल्या इमारतीत अडकल्याची भीती आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आह.
मदतीसाठी धावले शेकडो हाथ
दरम्यान आज च्या अपघाता ची बातमी समजताच शेकडो लोकांनी घटनास्थळी धावं घेऊन मदत कार्य केले.रात्री च्या वेळी सर्व पोलीस यंत्रणा,आपत्ती व्यवस्थापन टीम,कसारा,शहापूर मधील काही तरुण मंडळी,महसूल कर्मचारी अधिकारो ,पोलीस मदतीसाठी कार्यरत आहे.
रात्री घडलेली समृद्धी महामार्गांवरील पॅकेज 16 वरील घटना अतिशय वेदनादायी आहे.या अपघाताची चौकशी शासनामार्फेत केली जाईल -मंत्री दादा भुसे