शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

रेल्वे ट्रॅकवरील मोठी दुर्घटना टळली! कसारा घाटात अपघात; 400 फुट खोल दरीत गेला ट्रक, एक ठार तर एक जखमी  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 3:31 PM

Major Accident :  आज (गुरुवार ) पहाटे 2 च्या सुमारास मुंबई हुन नाशिककडे जाणारा मालवाहू ट्रक क्रमांक म्हणून.15.AG.0297 कसारा घाटात भरधाव वेगात नागमोडी वळण घेत असतांना चालका चा गाडीवरील ताबा सुटला व ट्रकने पुढे असलेल्या MH.04. JK 5417 या  ट्रक ला धडक दिली

ठळक मुद्दे400 फूट खोल दरीतून वर काढला. रामनाथ भिकाजीं उशीर, राहणार निफाड, जिल्हा नाशिक असे मृत चालकाचे ना

शाम धुमाळ

कसारा - मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात एका ट्रक ला आपघात होऊन ट्रक 400 फूट खोल दरीत त्यात एक जण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला सुदैवाने हा ट्रक खाली असलेल्या हिवाळा ब्रिज या रेल्वे पूलाच्या रेल्वे  ट्रॅकवर पडला नाही अन्यथा मोठा अनर्थ झाला असता घाटातून दरीत कोसळलेला ट्रक हिवाळा ब्रिज पासून 20 फूट अलीकडे कोसळला.

 आज (गुरुवार ) पहाटे 2 च्या सुमारास मुंबई हुन नाशिक कडेजाणारा मालवाहू ट्रक क्रमांक म्हणून.15.AG.0297 कसारा घाटात भरधाव वेगात नागमोडी वळण घेत असतांना चालका चा गाडीवरील ताबा सुटला व ट्रकने पुढे असलेल्या MH.04. JK 5417 या  ट्रक ला धडक दिली व थेट दरीत कोसळला सुमारे 400 फुट खोल दरीत ट्रक रात्रीच्या अंधारात कोसळल्याची माहिती मिळताच कसारा पोलीस,आपत्ती व्यवस्थापन टीम, महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दरीत पडलेल्या ट्रक मधील सचिन शिंदे याला रस्त्या खाली असल्याने जखमी अवस्थेत बाहेर काढलं व दरीत बेपत्ता चालकाचा शोध सुरु केला परंतु काही आढळून न आल्याने आज सकाळी पुन्हा.उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे  कसारा पोलीस अधिकारी केशव नाईक, महामार्ग पोलीस अधिकारी अमोल वालझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली   आपत्ती व्यवस्थापन टीम चे  शाम धुमाळ, दत्ता वाताडे,देवा वाघ, लक्ष्मण वाघ मनोज मालवा, महामार्ग पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हिरे, ए एस आय सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल गुजरे, सावकार,लगड, गोरे, आहेर, कसारा पोलीस ठाण्याचे रोंगटे,ए एस आय  मेंगाळ   यांनी दरीत उतरून तब्बल दोन तासात अडकलेला मृतदेह आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्यांनी

400 फूट खोल दरीतून वर काढला. रामनाथ भिकाजीं उशीर, राहणार निफाड, जिल्हा नाशिक असे मृत चालकाचे नाव असुन जखमी सचिन शिंदे याला नॅशनल हायवेच्या  रुग्णावाहिकेतून उपचारासाठी घोटी येथे तर मयत रामनाथ उशीर यांचा मृतदेह शहापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदणासाठी पाठवण्यात आले. 

... तर मोठा अनर्थ झाला असतामुंबई नाशिक महामार्ग वरील कसारा घाटाच्या खाली मुंबईहुन  नाशिक सह लांबपल्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचा लोहमार्ग आहे घाटाच्या खाली लोहमार्गांवरील ब्रिटिश खालीन हिवाळा ब्रिज आहे या हिवाळा ब्रिज वरून दररोज दिवस रात्र रेल्वे सेवा सुरु असते वरील घाटावर महामार्ग व खाली रेल्वे मार्ग असलेल्या या कसारा घाटात जर आपघात ग्रस्त ट्रक 25 ते 30 फूट अलीकडे कोसळला असता तर तो ट्रक हिवाळा ब्रिज वर व ब्रिज लगत असलेल्या सुरक्षा चौकी वर पडला असता ट्रक ब्रिज वर  कोसळला असता तर चौकीत असलेल्या पोलीस व रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी दुखापत झाली असतीच पण हिवाळा ब्रिज  वरील रेल्वे वाहतूक पूर्ण पणे बंद पडली असती. जर या दरम्यान एखादी मेल एक्सप्रेस नाशिक दिशेने जात असती तर मोठा अनर्थ घडला असता.

गुन्हा दाखल करण्याची मागणीदरम्यान निकृष्ट दर्जाचे संरक्षक कठडे बांधकाम करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या महामार्ग ठेकेदार व पोट ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी आपघातांतील मयत रामनाथ उशीर यांच्या नातेवाईकांनी केली आहे.

टॅग्स :AccidentअपघातKarjatकर्जतPoliceपोलिसDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल