शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

साहित्याची मेजवानी देणारा अत्रे कट्टा बदलणार

By admin | Published: May 26, 2017 12:06 AM

जिजामाता उद्यान, भास्कर कॉलनी येथे १६ वर्षे अविरतपणे सुरू असलेल्या आचार्य अत्रे कट्ट्याचे स्वरुप आता लवकरच बदलणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिजामाता उद्यान, भास्कर कॉलनी येथे १६ वर्षे अविरतपणे सुरू असलेल्या आचार्य अत्रे कट्ट्याचे स्वरुप आता लवकरच बदलणार आहे. एखाद्या महिन्यात पाचवा बुधवार आल्यास त्या दिवशी प्रेक्षकांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. तरुण प्रेक्षकांनी या कट्ट्यावर अधिकाधिक हजेरी लावावी, यासाठी कट्ट्याला वेगळे रुप देणार असल्याचे कट्ट्याच्या समितीने सांगितले. आठवड्यातील दर बुधवारी ठाणेकरांना साहित्याची मेजवानी देण्याचे काम कट्टा करीत आहे. आतापर्यंत कट्ट्यावर महिन्यातील चार बुधवारी फक्त कार्यक्रमच होत असे. विविध विषयांवर आमंत्रित मान्यवरांचे या ठिकाणी कार्यक्रम सादर होत. गेल्या १६ वर्षांत आठशेहून अधिक कार्यक्रम कट्ट्यावर झाले. २००१ मध्ये संपदा वागळे आणि विदुला ठुसे यांनी या कट्ट्याची स्थापना केली आणि पाहता पाहता या कट्ट्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत गेला. आता येथे वाचन कट्टा सारखा अभिनव उपक्रमाची सुरूवात होणार आहे. यात अभिवाचन, एखादा मान्यवर किंवा स्थानिक हे त्यांनी वाचलेल्या गोष्टींवर किंवा काय चांगले वाचले, काय वाचावे हे लोकांपर्यंत पोहोचविले जाणार आहे. महिन्यातील दोन बुधवार कार्यक्रम तर एक बुधवार वाचन कट्टा असेल. दुसऱ्या बुधवारी सभासदांची बैठक घेण्यात येईल. केवळ कार्यक्रमापुरतेच येथील सभासद एकत्र येत. त्यामुळे कार्यक्रमांची आखणी, विविध विषयांचे नियोजन यासाठी पुरेसा वेळ देणे शक्य नसे. आता महिन्यातील एक बुधवार बैठकीसाठी ठरविल्यामुळे कट्ट्यासंदर्भात निर्णय किंवा कट्ट्यावर पुढे आणखीन काय नावीन्यपूर्ण करता येईल, याबाबत चर्चा केली जाईल, नवनिर्वाचित अध्यक्षा शीला वागळे यांनी सांगितले. महिन्यात एखादा पाचवा बुधवार असेल तो दिवस प्रेक्षकांसाठी राखीव असेल. त्यादिवशी कट्ट्यावर प्रेक्षकांना व्यक्त होण्याची तसेच, आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. चार बुधवारपैकी पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी कार्यक्रम होतील.