उल्हासनगर : महापालिकेने कचरा डब्बा खरेदीच्या निविदा काढल्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक दिलीप मालवणकर यांनी स्मशानभूमी समोर उपोषण सुरू केले. डब्याची निविदा रद्द केली, नाहीतर जनहित याचिका दाखल करण्याचे संकेत मालवणकर यांनी दिली आहे.उल्हासनगर पालिका 6 कोटीच्या निधीतून कचऱ्याचे तब्बल 3 लाख 44 हजार डब्बे खरेदी करणार आहे. पालिका हद्दीत 1 लाख 72 हजार मालमत्ताधारक गृहीत धरून डब्याची निविदा काढण्यात आली. मात्र डब्याची संख्या मालमत्ताधारका पेक्षा जास्त असल्याची तक्रार करण्यात येत आहे. तसेच 40 हजार वाणिज्य मालमत्ताधारक असून त्यांनाही डब्बे देणार का? असा प्रश्न उपस्थित झाला. यासर्व प्रकियाला मालवणकर यांनी विरोध केला आहे. याविरोधात त्यांनी चक्क स्मशानभूमी समोर उपोषण सुरू केल्याने, एकच चर्चा सुरू झाली आहे.मालवणकर यांच्या उपोषणाला मनसे, पीआरपी, समाजसेवी संघटना, यांच्यासह माजी नगरसेवक शांताराम निकम यांनी पाठिंबा दिला. मात्र आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी शहर स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी मालमत्ताधारकांना कचऱ्याचे डब्बे देणार आहे. असे पालिका महासभे एका प्रश्नाच्या उत्तर देतांना सांगितले आहे.
उल्हासनगर स्मशानभूमीसमोर मालवणकर यांचे उपोषण, कचरा डब्याचा प्रश्न ऐरणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2017 4:38 PM