लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मानपाडा, आझादनगर भागातील एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण करुन तिला गुजरातमध्ये पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाºया मोहीत उर्फ लकीसिंग कुमार (२१) याला कापूरबावडी पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. त्याला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.आझादनगर भागातून या पिडित तरुणीचे २३ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मोहीत याने अपहरण केले होते. त्याचे आझादनगर भागात गॅरेज असून मुळचा तो उत्तरप्रदेशातील आहे. गुजरात राज्यातील अहमदाबाद जिल्हयात त्याने या मुलीला नेल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या पथकाने १६ जानेवारी २०२१ रोजी त्याला अहमदाबाद येथून ताब्यात घेतले. पिडित मुलगी अल्पवयीन असूनही त्याने तिला फूस लावून तिच्याशी लग्न करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची बाब तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 12:40 AM
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मानपाडा, आझादनगर भागातील एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण करुन तिला गुजरातमध्ये पळवून नेऊन तिच्यावर ...
ठळक मुद्दे कापूरबावडी पोलिसांची कामगिरी