लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बेकायदेशीररीत्या बियर आणि विदेशी मद्य विक्री करणाऱ्या ज्ञानेश्वर हरिभाऊ भालेकर ( रा. वामननगर, डोंगरीपाडा, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने नुकतीच अटक केली. त्याच्याकडून ७८ हजार २१४ रुपयांचे मद्य जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी रविवारी दिली.घोडबंदर रोड, येथील डोंगरीपाडा भागात एक व्यक्ती त्याच्या राहत्या घरात बेकायदेशीर मद्य विक्री करीत असल्याची माहिती वागळे युनिटच्या पथकास १९ नोव्हेंबर रोजी मिळाली होती. या माहितीच्या आधारे घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी देशी दारूसह विविध कंपन्यांच्या विदेशी मद्याची विक्री होत असल्याचे आढळले. याप्रकरणी भालेकर याच्याविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात दारुबंदी अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
ठाण्यात देशी-विदेशी मद्याची विक्री करणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 4:28 PM
बेकायदेशीररीत्या बियर आणि विदेशी मद्य विक्री करणाऱ्या ज्ञानेश्वर हरिभाऊ भालेकर ( रा. वामननगर, डोंगरीपाडा, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने नुकतीच अटक केली.
ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाई ७८ हजारांचे मद्य जप्त