लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: भिवंडीतून ठाण्यातील वागळे इस्टेट भागात गांजाची विक्री करणाºया नरुलहक अक्तर सय्यद (२६, न्यू. शांतीनगर, आझादनगर, भिवंडी, ठाणे) यास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या वागळे इस्टेट पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाख ५३ हजारांचा १२ किलो ६९० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.वागळे इस्टेट ज्ञानसाधना महाविज्ञालयाकडे जाणाºया मार्गावरील सेवा रस्त्यावर एक जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार यांच्या पथकाने १५ सप्टेबर रोजी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास या मार्गावर सापळा रचून नुरुलहक सय्यद याला ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीमध्ये एका सफेद रंगाच्या प्लास्टीकच्या गोणीमधून चार वेगवेगळया गठठयातून एक लाख ७० हजार ८०० रुपयांचा आठ किलो ५४० ग्रॅम वजनाचा गांजा तसेच तिथून पसार झालेल्या त्याच्या साथीदाराच्या ताब्यातून ८३ हजारांचा चार किलो १५० ग्रॅम असा दोन लाख ५३ हजारांचा गांजा हस्तगत केला आहे. गांजा विक्री आणि वाहतूक केल्याप्रकरणी सय्यद याच्याविरुद्द वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले होते. त्याला आता १४ दिवस न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्याच्या दुसºया साथीदाराचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भिवंडीतून गांजाची तस्करी करणाऱ्यास ठाण्यात अटक: अडीच लाखांचा गांजा हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 9:27 PM
वागळे इस्टेट भागात गांजाची विक्री करणा-या नरुलहक अक्तर सय्यद (२६) यास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाख ५३ हजारांचा गांजा जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठळक मुद्देठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाविद्यालय परिसरात गांजा विक्रीचा प्रयत्न