शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून इसमाची लोकलखाली आत्महत्या

By सदानंद नाईक | Published: January 27, 2023 4:57 PM

४० टक्के व्याजाने घेतला गिरीशचा बळी, पत्नी व मुलाची मागितली माफी

उल्हासनगर : घरसंसार चालविण्यासाठी घेतलेल्या ४० टक्के व्याजाच्या तगाद्याला कंटाळून गिरीशने सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून २४ जानेवारी रोजी आत्महत्या केली. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पठाणी व्याजखोरावर कारवाईची मागणी वृद्ध वडिलांनी केली. गिरीशच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, वृद्ध आई-वडील आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात राहणारा गिरीश चुग हा पत्नी, दोन लहान मुले व वृद्ध आईवडील सोबत राहत होता. परिसरातील एका गारमेंट दुकानात कामाला असलेल्या गिरीशच्या सहकारी दोन मित्रांनी चुगली केल्याने, त्याला दोन महिन्यांपूर्वी गारमेंट दुकान मालकाने कामावरून काढले. हाताला काम नसल्याने, घरसंसार चालविण्यासाठी त्याने काही जणांकडून दरमहा ४० टक्के व्याजाने १ लाख रुपये उसने घेतले. मात्र ४० टक्के दरमहा व्याज देऊ न शकल्याने, व्याजाच्या पैशासाठी तगादा सुरू झाला. व्याजाने पैसे देणाऱ्यानी थेट घरी मोर्चा वळविल्याने, गिरीश चुग हादरून गेला. व्याजाचे पैशे देऊ शकत नसल्याने, त्याने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

गिरीश याने २४ जानेवारी रोजी अंबरनाथ व बदलापूर रेल्वे स्थानकाच्या मधोमध रेल्वे रुळावर आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडीओ मध्ये त्याने व्याजाच्या पैशाचा तगादा व चुगली करणाऱ्या सहकार्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करतो. तेच आत्महत्याला जबाबदार असतील असे सांगितले. ४० टक्के व्याजाच्या पैशासाठी तगादा लावणाऱ्या दशरथ, रमेश सिंग, गोलू सिंग, गायकवाड, दुकानातील चुगली लावणारे सहकारी जय, विनोद यांच्यावर कारवाई करण्याची विनंती गिरीश याने पोलिसांना केली. ३ व १ वर्षाच्या मुलाचा व वृद्ध आई-वडिलांच्या सांभाळ करण्याची विनंती पत्नीला करून, मला माफ कर. असा व्हिडिओ मध्ये म्हणाला. तसेच मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या विरोधात तक्रार देऊन अद्दल घडण्यास त्याने पत्नीला सांगितले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर एकच खळबळ उडाली असून पठाणी व्याजखोरावर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.

वृद्ध वडिलांचा टाहो एकुलता एक मुलगा असलेला गिरीश पत्नी, दोन लहान मुलासह वृद्ध आईवडिलांचा सांभाळ करायचा. त्याच्या मृत्यूने आमचा सांभाळ कोण करणार? असा प्रश्न करून वडिलांनी टाहो फोडला. व्हिडिओ मध्ये घेतलेल्या नावाच्या इसमावर कारवाई करण्याची मागणी वृद्ध वडिलांनी केली.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर