शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

ठाण्यात मनोरुग्ण मुलाने केला पित्यावर चाकू हल्ला; फिरायला न नेल्याचा राग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 8:56 PM

आपल्याच पित्यावर चाकूने वार करणा-या सागर सांगळे (२४) याला श्रीनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. त्याला ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

ठाणे : आपल्याच पित्यावर चाकूने वार करणा-या सागर सांगळे (२४) याला श्रीनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. त्याला ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.किसननगर येथील रहिवासी नामदेव सांगळे हे २७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरातील हॉलमधील पलंगावर मोबाइल पाहत बसले होते. त्याच वेळी त्यांचा मुलगा सागरने त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. त्यांच्या पोटावर, मांडीवर आणि हातावर त्याने वार केल्याने यात ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून २८ नोव्हेंबर रोजी सकाळी सागरला अटक केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक बी.पी. बनसोडे यांनी दिली.फिरायला न नेल्याचा रागसागर मनोरुग्ण असल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्याच्या या मानसिक आजारामुळे त्याला वडील नामदेव हे बाहेर जाऊ देत नव्हते. यातूनच आलेल्या रागातून त्याने आपल्या वडिलांवर चाकूने हल्ला केला, अशी फिर्याद त्याच्या आईने मुलाविरुद्ध दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Crimeगुन्हा