लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एका अल्पवयीन मुलीची छेड काढून तिचे अपहरण करीत असल्याच्या संशयातून रामअवतार प्रल्हाद धोबी (३४, रा. गौतमनगर, हाजूरी, वागळे इस्टेट, ठाणे) याला एका जमावाने जबर मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या मारहाणीतच त्याचा मृत्यु झाला असून याप्रकरणी अतिक खान (३९) याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.गौतमनगरातील सोडेचाळीमध्ये राहणाऱ्या रामअवतार याने २९ मे रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास त्याच भागातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढून तिला घेऊन जात असल्याचा एका गटाचा आरोप आहे. याच आरोपातून आठ ते दहा जणांच्या जमावाने गौतमनगर हाजूरी भागातील सवेरा लॉजच्या समोरील रस्त्यावर त्याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर त्याला वागळे इस्टेट पोलिसांनी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याला दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात खून आणि दंगलीचा गुन्हा ३० मे रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले आणि पोलीस निरीक्षक विजय मुतडक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अरविंद वळवी आणि उपनिरीक्षक निकुंभ यांच्या पथकाने अतिक खान, मोहसिन शेख (३७), अफसर वस्ता (३९), हरीश सोळंकी (३२) आणि मोहम्मद अन्सारी (६९) या पाच जणांना रविवारी ६ वाजण्याच्या सुमारास अटक केली. यातील आणखी पाच जणांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या संशयातून ठाण्यात जमावाने केली एकाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 23:09 IST
एका अल्पवयीन मुलीची छेड काढून तिचे अपहरण करीत असल्याच्या संशयातून रामअवतार प्रल्हाद धोबी (३४, रा. गौतमनगर, हाजूरी, वागळे इस्टेट, ठाणे) याला एका जमावाने जबर मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली.
अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या संशयातून ठाण्यात जमावाने केली एकाची हत्या
ठळक मुद्दे पाच जणांना अटकवागळे इस्टेट पोलिसांची कारवाई