ठाणे : वागळे इस्टेट येथील ‘ओम प्रोसिंग वर्क्स’ मधून स्टीलच्या प्लेट चोरणा-या दोघांपैकी मांजू देवरस या बिगारी कामगाराला वागळे इस्टेट पोलिसांनी मंगळवारी अटक केली. कंपनीच्या मालकासह तीन कामगारांनी साखळीने बांधून मारहाण केल्याची तक्रार त्याने केली आहे.दारू पिण्यासाठी मांजू आणि त्याचे काही साथीदार सोमवारी बाहेर पडले होते. त्यांच्यापैकी भाईजान याने दारूसाठी पैसे नसल्याने ओम प्रोसिंग वर्क्समध्ये चोरीची योजना आखली. तेथील सुरक्षारक्षक झोपल्याचा फायदा घेऊन मांजू आणि त्याच्या साथीदाराने मंगळवारी पहाटे या कंपनीतून स्टीलच्या १५ ते १६ रिंग बाहेर काढल्या. सीसीटीव्हीमुळे हा प्रकार कंपनीचे मालक देवीदयाल पाल यांच्यासह काही कामगारांच्या निदर्शनास आला. चोरीच्या मालासह त्यांना पकडल्यानंतर पाल आणि त्याचा साथीदारांनी भाईजान यांना पकडले. मात्र, भाईजान त्यांच्या तावडीतून पसार झाला. त्यानंतर पाल आणि कामगारांनी मांजूला मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी पोलिसांनी मांजूविरुद्ध चोरीचा तर त्याला मारहाण करणाºया चौघांविरुद्धही गुन्हा दाखल केला.
चोरी करणाऱ्या तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 12:42 AM