शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कंत्राटी अधिकाऱ्यांकडे २९ जिल्ह्यांचे व्यवस्थापन; आपत्ती व्यवस्थापनाबाबत उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 1:21 AM

एखाद्या ठिकाणी पूर, इमारत कोसळणे किंवा इतर हानी झाल्यास मदतीसाठी राज्यातील २९ जिल्ह्यांत आपत्ती व्यवस्थापन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.

ठाणे : एखाद्या ठिकाणी पूर, इमारत कोसळणे किंवा इतर हानी झाल्यास मदतीसाठी राज्यातील २९ जिल्ह्यांत आपत्ती व्यवस्थापन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, या केंद्रात काम करणारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ही दोन्ही पदे केवळ तात्पुरत्या किंवा कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहेत. परंतु, प्रत्यक्षात पदनिर्मिती मात्र करण्यात आलेली नाही.राज्यात नैसर्गिक आपत्तीच्या दुर्घटना घडत आहेत. मात्र, याबाबत राज्य शासनामध्ये एवढी उदासीनता आहे की, राज्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्यासह प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या पदांची निर्मिती केली नसल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये माळीणसारखी दुर्घटना घडलेल्या पुणे आणि नाशिक जिल्ह्यांचा समावेश आहे. या पदांची निर्मिती करण्यात न आल्याने आपत्ती व्यवस्थापनही कोलमडले आहे. विविध नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी २००३ साली राष्ट्रीय विकास कार्यक्र म (यूएनडीपी) आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील बहुआपत्तीप्रवण ३६ जिल्ह्यांत व १० महानगरपालिकांमध्ये राबवण्यात आला. २००९ मध्येच राज्य शासनाने १४ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन कार्यक्र म (एमडीआरएम) राबवण्याचा निर्णय घेतला. जून २०१० पासून या कार्यक्रमाची (एमडीआरएम) अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली.महाराष्ट्रात सहा विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक व प्रत्येक जिल्ह्यात ३६ आपत्ती व्यवस्थापन अधिकारीपदे निर्माण केली असूनही अनेक जिल्ह्यांत या अधिकाºयांची कायमस्वरूपीस्वतंत्र पदनिर्मितीच न केल्यानेया प्राधिकरणाचा बोजवारा उडाला आहे.ही आहेत प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्रेनवी मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, नाशिक, अमरावती, नागपूर.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाºयांकडे जिल्हास्तरावरील आपत्तीविषयक कार्यक्र माचे नियोजन करण्याची जबाबदारी असते. परंतु, बहुतेक जिल्ह्यांत ही पदेच रिक्त आहेत. अशीच काहीशी परिस्थिती राज्यातील १० प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागांची आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र